सांगोला ( प्रतिनिधी ) : - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवाडी सांगोला तालुक्यातील पहिली आय .एस .ओ . शाळा असून बहुतांश सर्व भौतिक सुविधांनी परिपूर्ण आहे .
सदर शाळेची गुणवत्ता ही असून उपक्रमशील शिक्षक कार्यरत आहेत . शाळेची सुरक्षितता आणि हिताच्या दृष्टीने डॉ.प्रभाकर माळी यांनी जवळ जवळ पंचवीस हजार कि मतीच सिसिटीव्ही कॅमेरा बसवून दिले आहेत . यामुळे शालेय सर्व घटना दिसू शकणार आहेत . या नाविन्य पण उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री.प्रकाश यादव आणि केंद्रप्रमुख श्री.ईश्वर भोसले यांनी सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले . डॉ.प्रभाकर माळी यांचे शाळाव्यवस्थापन अध्यक्ष आणि बांधकाम समिती सभापती सांगोला श्री.गजानन बनकर , उपाध्यक्ष अनिल बनकर , माजी नगरसेवक श्री.शिवाजी बनकर , उद्योजक श्री.सदाशिव बनकर , सि.ए.उत्तम बनकर , श्री.महादेव बनकर , श्री.रामचंद्र बनकर , मुख्याध्यापक डॉ.राजेश्वरी कोरे व शिक्षक , सर्व व्यवस्थापन समिती सदस्य आणि बनकरवाडी रहिवासी यांनी आभार मानले .


0 Comments