google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील परवाना धारक बिअरबार विक्रेते अवैध दारू विक्री मुळे त्रस्त ; विनापरवाना दारू विक्रेत्यांमुळे बार चालक अडचणीत

Breaking News

सांगोला तालुक्यातील परवाना धारक बिअरबार विक्रेते अवैध दारू विक्री मुळे त्रस्त ; विनापरवाना दारू विक्रेत्यांमुळे बार चालक अडचणीत

सांगोला तालुक्यातील परवाना धारक बिअर बार परमिट रूम, मालक/ चालक हे सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य विनापरवाना दारू विक्री मुळे अडचणीत सापडले आहेत. दिवसंदिवस जागोजागी अवैद्य दारू विक्रीचे धंदे वाढत असल्यामुळे परवानाधारक बिअर बार परमिट रूम मध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील परवानाधारक बिअर बार परमिट रूम विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

अवैद्य विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांवर संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासन कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याने या अवैध दारू विक्री करणाऱ्यांना संबंधित विभागाकडूनच बळ मिळत असल्याने सांगोला तालुक्यात अवैद्य दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत चाललेला आहे.सांगोला तालुक्यातील काही परवानाधारक दारू विक्रेते हे संबंधित विभागाचे हात ओले करून नियमबाह्य पद्धतीने आपल्या दुकानातून तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्रेत्यांना दारूची बेकायदेशिर विक्री करत आहेत. 

त्यामुळे सांगोला तालुक्यात अवैद्य दारू विक्री व्यवसाय करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामुळे परवाना घेऊन बिअर बार परमिट रूम चालवणाऱ्यांना या अवैध दारू विक्रीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे त्यामुळे काही बिअर बार परमिट रूम चालकावर परमिट रूम बंद करावे की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्‍य उत्‍पादन शुल्‍क शुल्क विभाग व पोलिस प्रशासन या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून सांगोला तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैद्य दारू व्यवसाय तातडीने बंद करावा अशी तालुक्यातील बिअर बार परमिट रूम चालका मधून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments