सांगोला पोलीस स्टेशनचे वतीने सर्व शिवजयंती मंङळाना अहवान करण्यात येते की,
छ.शिवरायांचा जन्मोत्सव 19 फेब्रुवारीला साजरा केला जातो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असा आदेश गृह विभागाने नुकताच काढला आहे.सांस्कृतिक कार्यक्रम, पदयाञा, मोटार सायकल रॅली,यास बंदी घालण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोनामुळे साधेपणानेच साजरी करावी.सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे.छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. 10 व्यक्तींच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करावी.शिवजयंतीनिमित्त आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करावे.परंतु परवागी घ्यावी. त्यावेळी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता अशा नियमांचे पालन करावे, तसेच दहा व्यक्तींशिवाय अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊ नये.छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अथवा पुतळ्याला पुष्पहार घालताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे करावे.
भगवानराव निंबाळकर
पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस स्टेशन


0 Comments