
पंढरपूर- सांगोला रोडवरील खर्डी या गावाजवळ आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बोलेरो व ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये २ महिला १ पुरुष व १ लहान मूल मयत झाले आहे. बोलेरो मधील सर्वजण देव दर्शनासाठी जात होते. सदरची बोलेरो हि कर्नाटक पासिंगची असून या बोलेरो मधील प्रवासी हे कोल्हापुरातील चंदगड येथील भाविक बोलेरो गाडीतून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला येत होते. पंढरपूर अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाच कासेगाव जवळच्या रस्त्यावर बोलेरो व ट्रकचा भीषण अपघात झाला.अपघात इतका जोरदार होता की, बोलेरोचा चेंदामेंदा झालाय. या अपघातात दोन महिला आणि एक पुरुष आणि लहान मुलं अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झालाय.कोल्हापुरातील एक कुटुंब गाडीनं पंढरपूरला जात असताना आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास कासेगाव परिसरात हा अपघात घडलाय. जखमींना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0 Comments