google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस ठाणेमधील संदिप पर्वते व राहुल देशमुख यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

Breaking News

सांगोला पोलीस ठाणेमधील संदिप पर्वते व राहुल देशमुख यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला पोलीस ठाणेकडील नेमणुकीचे पो.ना.संदिप गोरक्ष पर्वते वय ३१ ब.नं. १७८३ , तसेच पो.कॉ. राहुल विष्णु देशमुख व.नं.वय ३० यांची २०१७ मध्ये खात्या अंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणुन निवड झालेली आहे .


सदर परीक्षेचा अंतिम निकाल दि .१० फेब्रुवारी२०२१ रोजी झाला आहे . पो.ना. संदिप पर्वते यांचे मुळ गाव वांगी ता . उ.सोलापुर असुन त्यांचे शिक्षण एमए.डीएड झालेले आहे . ते सोलापुर ग्रामीण पोलीस दलात दि .२१ / १० / २००८ रोजी पोलीस कॉन्स्टेब्ल पदावर भरती झालेले होते . त्यानी वेळापुर व सांगोला पोलीस ठाणेस नोकरी केलेली आहे . पो.का. राहुल देशमुख यांचे मुळ गाव पडसाळी ता , माढा असुन त्यांचे शिक्षण बी.ए. झाले.ते सोलापुर ग्रामीण पोलीस दलात दि . २४/०१/२०१२ रोजी पोलीस कॉन्स्टेबल पदावर भरती झालेले असुन त्यानी सांगोला पोलीस ठाणेस नोकरी केलेली आहे . दोघांचेहीशिक्षण , नोकरी ग्रामीण भागात झालेली आहे . पोलीस प्रशासनात नोकरी करीत असताना , उपलब्ध वेळेत अभ्यास व सराव करुन त्यानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारे खात्याअंतर्गत थेट पोलीस उपनिरीक्षक परीक्षा देवुन सदरचे घवघवीत यश संपादन केलेले आहे . त्यानी मिळविलेले यशामुळे पोलीस प्रशासनाची मान उंचावलेली आहे . पो.ना. संदिप पर्वते व पो.कॉ. राहुल देशमुख यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याने सांगोला पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री भगवान निंबाळकर यांनी त्यांचे कौतुक करुन मिळविलेल्या यशाबद्दल यथोचित सत्कार करुन पुढील यशस्वी कारकिर्दीकरीता शुभेच्छा दिल्या . सदर प्रसंगी सांगोला पोलीस ठाणेचे स.पो.फौ , ढवणे , माळकोटगी तसेच देशमुख , पवार , जाधव , कुलकर्णी , पिसे , अंकुशराव , चोरमले असे उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments