google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदे मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत राबविला जाणार जनजागृती महिना पथनाट्ये , वासुदेव फेरी , होम मिनिस्टर स्पर्धा मार्फत होणार जनजागृती

Breaking News

सांगोला नगरपरिषदे मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत राबविला जाणार जनजागृती महिना पथनाट्ये , वासुदेव फेरी , होम मिनिस्टर स्पर्धा मार्फत होणार जनजागृती

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला नगरपरिषदेमार्फत स्वच्छ महाराष्ट्र व माझी वसुंधरा या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे . कोणत्याही शासकीय योजनेची सफ लता ही त्या योजनेतील जनसहभागावर अवलंबून असते . नेमकी हीच बाब ओळखून या दोन्ही अभियाना बाबत सांगोला शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी या हेतूने सांगोला नगरपरिषदेमार्फत जनजागृती महिना साजरा केला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली .देशास स्वच्छ सुंदर वनवणे व घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे या मुख्य हेतूने ' स्वच्छ भारत अभियान ' राबविले जाते . या अभियानाची उद्दिष्टे साध्य व्हावीत म्हणून दरवर्षी केंद्र सरकार मार्फत देशातील सर्व नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध निकषांच्या आधारावर ' स्वच्छ सर्वेक्षण ' नावची स्पर्धा आयोजित केली जाते . स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील नगरपालिका मध्ये स्वच्छता , घनकचरा व्यवस्थापन याबाबत चांगली कामगिरी करून आपल्या शहराचे मानांकन अव्वल आणण्यासाठी दरवर्षी पहावयास मिळते . याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी संघटित प्रयत्न करावेत या उद्देशाने ५ प्रमुख घटकांवर आधारित ' माझी वसुंधरा ' अभियान राज्य सरकार मार्फत राबविले जात आहे . स्वच्छता राखणे , कचरा वर्गीकरण , होम कंपोस्टिंग करणे , प्लास्टिक चा वापर टाळणे , पाण्याची बचत करणे , वृक्ष लागवड करणे , ऊर्जास्रोतांची वचत करणे , प्रदूषण रोखणे या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी नागरिकांच्या मानसिकतेत बदल होऊन जबाबदारीची भावना निर्माण होणे ही काळाची गरज आहे . मानसिकतेत बदल होण्यासाठी निरंतर प्रयत्न आवश्यक आहेत आणि यासाठीच सांगोला नगरपरिषदेमार्फत ' जनजागृती महिना ' राबविला जाणार आहे . यामध्ये सलग एक महिन्याच्या कालावधीत शहरात प्रमुख चौकांमध्ये जनजागृती पर पथनाट्ये सादर केली जाणार असून सर्व प्रभागांमध्ये ' वासुदेव फेरी ' या नाविन्यपूर्ण संकल्पनेचा वापर केला जाणार आहे .


होम कंपोस्टिंग व इतर सर्व गोष्टींबावती महिलांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता ' होम मिनिस्टर ' सारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे . या जनजागृती महिन्यात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांपासून प्रेरणा घेऊन शहरातील नागरिकांनी स्वत : मध्ये जबाबदारीची भावना निर्माण करून त्याप्रमाणे कृती केल्यास या दोन्ही अभियानांना लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊन अभियानाची उद्दीचे साध्य होतील असे मत नगराध्यक्षा मा.राणिताई माने यांनी केले

Post a Comment

0 Comments