नकली नोटांचा सुळसुळातट, सतर्कतेच्या सूचना बाजारात नकली नोटांचा सुळसुळाट झाल्याने रिझर्व बँकेने सतर्कतेच्या सूचना देत नोटा ओळखण्याचे मार्ग सांगितले आहेत.
तुमच्या खिशातील नोटा
नकली तर नाहीत ना ?
नवी दिल्ली : बाजारात पन्नास आणि दोनशे रुपयांच्या नकली नोटांचा सुळसुळाट झाला असल्याने तुमच्या खिशातील नोटा नकली तर नाहीत ना याची खात्री करून घ्या अन्यथा घोटाळा होईल, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली सरकारने पाचशे आणि हजार रुपयांची नोट बंद केली आणि नवी दोन हजार रुपयांची नोट आणली. त्यापाठोपाठ पन्नास, शंभर,आणि दोनशे रुपयांचीही नवी नोट चलनात आणली. या नव्या नोटाच्याही नकली नोटा बाजारात आढळून येत आहेत. त्यामुळे नकली नोटा ओळखण्याबाबत आणि नकली नोटांपासून सतर्क राहण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत.
पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नकली नोटा पकडण्यात आल्याने नकली नोटा छापणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे त्यामुळे पन्नास आणि शंभर रुपयांच्या नकली नोटा बाजारात येण्याची शक्यता गृहीत धरून रिझर्व्ह बँकेने सतर्कतेचे आवाहन करीत नोटा ओळखण्याचे काही मार्ग सांगितले आहेत. पन्नास आणि दोनशे रुपयांची नोट खरी आहे की बनावट आहे हे ओळखण्याच्या एकाच खुणा असून यामध्ये ५० रुपयांच्या खऱ्या नोटमध्ये देवनागरीत ५० लिहिलेले असते, ते नकली नोटवर नसते. त्यामुळे ५० रुपयांच्या नोटेवर '५०' लिहिलेलं असेल तरच नोट घ्यावी. नोटेच्या मधोमध महात्मा गांधी यांचा फोटो असतो. तसेच माइक्रो लेटर्स मध्ये RBI, भारत, INDIA आणि ५० लिहलेले असते. नोटेच्या मधोमध सुरक्षेचा धागा म्हणजे नोटेची तार असते. तसेच इलेक्ट्रोटाईप (५०) वॉटरमार्क नोटेच्या उजव्या बाजूस आढळतो आणि अशोक स्तंभ दिसतो. स्वच्छ भारत मिशनचा लोगोही आणि घोषणाही नोटेवर पहायला मिळते. असे असेल तर ती नोट खरी समजण्यात यावी. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या खुणांवरून नोट ओळखली जावी.
बाजारात नकली नोटांचा सुळसुळाट पाहता सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून प्रत्येकाने याबाबत जागरूक राहणे गरजेचे बनले आणि अन्यथा फसवणूक तर होईलच पण अन्य संकटांचाही सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही


0 Comments