सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित , तहसीलदार अभिजीत पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे , सहा.पोलीस निरीक्षक नागेश यमगर , आरोग्य निरीक्षक संजय दौंडे , शरद माने , महसूल कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शहरातील विविध दुकाने , हॉटेल्स , मेडिकल , सलून दुकाने , पानटपरी , चहा कॅन्टीन , सांगोला बसस्थानक | आदी गर्दीच्या ठिकाणी भेटी देऊन मास्क न वापरणाऱ्या ५ ९ लोकांवर दंडात्मक कारवाई करीत सुमारे २२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला
. प्रशासनाने अचानक कारवाईचा बडगा उगारल्याने व अधिकारी दिसताच सर्वांच्या | तोंडाला मास्क लावल्याचे चित्र पहावयास मिळाले . कोरोनाची लस आली असली तरी प्रत्येकापर्यंत लस पोहोचण्यासाठी बराच वेळ लागणार आहे . आहे . नागरिकांनी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे शासनाकडून सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे . मात्र कोरोनाची लस आली असल्याने व सांगोला तालुक्यात कोरोनाचा | उद्रेक कमी असल्याने नागरिक बिनधास्त झाले असून मास्क व शारीरिक अंतराचे पालन करण्यात कुचराई करीत आहेत .कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सांगोला प्रशासन अलर्ट झाले असून नगरपालिका , महसूल व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवली आहे . विना मास्क , सार्वजनिक ठिकाणी थुकणे , सोशल डिस्टन्स | न पाळणे तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.शहरातील नागरिकांची बेपर्वाई लक्षात घेऊन मंगळवारी प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी अंकित , तहसीलदार अभिजित पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे , सहाय्यक पोलीस कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सांगोला प्रशासन अलर्ट झाले असून नगरपालिका , महसूल व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवली आहे . विना मास्क , सार्वजनिक ठिकाणी थुकणे , सोशल डिस्टन्स | न पाळणे तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.शहरातील नागरिकांची बेपर्वाई लक्षात घेऊन मंगळवारी प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी अंकित , तहसीलदार अभिजित पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे , सहाय्यक पोलीस नागेश यमगर यांनी विशेष मोहीम राबवून मास्क न लावलेल्या नागरीकांना दंडात्मक कारवाईचा दणका दिला . शहरातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ५ ९ जणांकडून २२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे . कठोरतेने ही मोहीम राबवणे गरजेचे झाले आहे . आता ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून विनाकारण घराबाहेर पडू नये , बाहेर निघताना मास्क घालुनच घरा बाहेर निघावे , शारीरिक अंतराचे पालन करावे , व्यापारी बांधवांनी मास्क वापरून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहेसांगोला कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सांगोलकरांनी गर्दी पात नका ; गर्दीपासून प्रशासन गाफील असाचे हे आश्चर्यच या सदरखाली माणदूत एक्सप्रेसमध्ये काल २३ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते . सदरच्या बातमीची दखल घेत सांगोला शहरात काल मंगळवार दि .२३ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास सांगोला तहसील कार्यालय , सांगोला पोलीस स्टेशन व सांगोला नगरपालिकेच्यावतीने संयुक्तरित्या धडक कारवाई करत कोरोना नियम मोडणाऱ्यांविरोधात प्रशासन अॅक्शनमध्ये दिसून आले . सदर कारवाई दरम्यान परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अंकितकुमार , तहसीलदार अभिजीत पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्र , सहा.पोलीस निरीक्षक नागेश यमगर खुद्द रस्त्यावर उतरले होते .


0 Comments