नगरपरिषदेच्या सुमारे 1 कोटी 87 लाख रूपयांच्या विविध कामास प्रशासकीय मंजुरी : लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने
सांगोला/प्रतिनिधी सांगोला नगरपरिषदेच्या सुमारे 1 कोटी 87 लाख रूपयांच्या विविध कामास जिल्हाधिकारी यांंच्याकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली. या मध्ये कुंभार गल्ली येथील सतीच्या विहीरतून कुंभार गल्ली व रामोशी गल्ली येथील सार्वजनिक शौचालयास शहरातील आडामधून पाणी पुरवठा करणे- 3 लाख 64 हजार 534 रूपये, कोष्टी गल्लीतील आडातून भोपळेरोड व खडतरे गल्ली सार्वजनिक शौचालयास शहरातील आडामधून पाणीपुरवठा करणे - 4 लाख 39 हजार 601 रूपये, आठवडा बाजारातील विहीरतून सनगर गल्ली भिमनगर व साठेनगर येथील सार्वजनिक शौचालयास शहरातील आडामधून पाणी पुरवठा करणे - 4 लाख 34 हजार 127 रूपये, अंबिकादेवी मंदिराजवळील आडातून धनगर गल्ली व आ.क्र. 44 शॉपिंग सेंटर येथील सार्वजनिक शौचालयास शहरातील आडामधून पाणी पुरवठा करणे - 3 लाख 32 हजार 475 रूपये, नगरपरिषद कार्यालयामागील आडावरून तेली गल्ली येथील सार्वजनिक शौचालयास शहरातील आडामधून पाणी पुरवठा करणे - 3 लाख 34 हजार 196 रूपये, त्याचबरोबर नगरपरिषद सांगोले अंतर्गत चिंचोली विहीर ते जलशुध्दिकरण कंेंद्र उध्दारण नलिका टाकणे व उपसा यंत्रे बसविणे (सुरक्षात्मक कामांतर्गत) - 1 कोटी 68 लाख 25 हजार 761 रूपये या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. सदरची कामे ही 14 व्या वित्तआयोगातंर्गत करण्यात येणार असून लवकरच या कामांचे निविदा प्रक्रिया करून ही कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिले.



0 Comments