google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कडलास येथे विज कनेक्शन का तोडले म्हणून , वायरमनला ठार मारण्याची धमकी

Breaking News

सांगोला कडलास येथे विज कनेक्शन का तोडले म्हणून , वायरमनला ठार मारण्याची धमकी

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - थकबाकीदार असलेल्या वीज ग्राहकाचे वीज कनेक्शन का तोडले म्हणून दोघांनी वायरमनला शिवीगाळ , दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना कडलास , ता . सांगोला येथे मंगळवार दि . २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे .


वीज कर्मचारी सागर चतुरराव हाके रा , जवळा हे आज मंगळवार दिनांक २३ रोजी सकाळी ११ च्या सुमारास कडलास गावातील वीज बिल थकीत रकमेची वसूली असताना वीज कनेक्शन का तोडले असे म्हणाला , तुला यांचेच कनेक्शन दिसले का , गावातली इतर कनेक्शन का तोडली नाहीत असे म्हणून वीज कर्मचाऱ्यास शिवीगाळी , दमदाटी करू लागला . यावेळी वायरमन हाके याने याबाबत मला न विचारता आमच्या साहेबांना सांगा असे म्हणत असतानाच शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली व शर्टाच्या गच्चीला धरून तू गावात नोकरी कशी करतो ते बघून घेतो अशी दमदाटी केली . यामुळे सागर चतुरराव हाके यांनी भा द वि ३५३ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे .

Post a Comment

0 Comments