google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात विना मास्क फिरणाऱ्या वर कारवाई

Breaking News

सांगोला शहरात विना मास्क फिरणाऱ्या वर कारवाई

 सांगोला , ( वार्ताहर ) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सर्वत्र चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला सांगोला शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाविषयक शासकीय नियमांचे उल्लंघन करून काही नागरिक बिनधास्त विनामास्क फिरताना दिसून येत आहेत . गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने व सरकारने कोरोनाबाबत नियमांचे पालन करा ,


अन्यथा वेगळा निर्णय घेतला जाईल , असे सांगितले असतानाही बेशिस्त लोकांमुळे कोरोनालाच भीती वाटावी , अशी स्थिती होती . अखेर तहसील कार्यालय , नगरपालिका व पोलीस प्रशासना कडून एकत्रित मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी सांगोला शहरात विविध चौकात आणि बसस्थानक परिसरात मास्क न वापरणयावर कारवाई करण्यात आली तर शालेय विद्यार्थ्यांनाही कोरोना नियम पालनाबाबत प्रबोधन करण्यात आले . यामुळे सर्वत्र नागरिक व व्यापारी , मोटारसायकल चालक यांनी घाईगडबडीत रुमाल व मास्क तोंडाला लावत होते . तहसीलदार अभिजीत पाटील , मुख्याधिकारीकैलास केंद्रे , स.पो.नि नागेश यमगर यांच्या सह विविध विभागावर अधिकारी - कर्मचारी यांच्या एकत्रित पथकाने सांगोला शहरातील विविध चौकात बिगर मास्क फिरणारे शोधून कारवाईस सुरवात केली . त्यानंतर शहरातील विविध हॉटेल टिपर्या , कपडे दुकान , मोबाईल दुकान याठिकाणी गर्दी असते अशी मोठी दुकानात जाऊन तपासणी केली . मास्क नसेलतर प्रवेश देऊ नका असे सागितले .सार्वजनिक - दुकाने , चौक , गर्दीच्या ठिकाणी । जिकडे - तिकडे ' मास्क लाव , रे मास्क लाव असेच ऐकावयास मिळत होते . मास्क वापरूनच कोरोनाला प्रतिबंध घालता येऊ शकतो , याची जाणीव करून देणे आवश्यक आहे . अनेक बेशिस्त नागरिक मास्कचा वापर करत नाहीत वस्तुस्थिती आहे . याउलट विविध प्रशासकीय कार्यालयातच शासकीय नियमांचे पालन होते की नाही कोण ? शासकीय कार्यालयाच्या ' दिव्याखाली अंधार ' असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहेत . एका बाजूला नागरिकांना मास्क लावावा असे आवाहन करायचे आणि सरकारी कार्यालयाच्या परिसरात मास्क वापरले जाते का ? तपासले पाहिजे , अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे . सुरक्षित अंतर ठेवणे , विनाकारण बाहेर न फिरणे व बाहेर जाताना मास्क वापरणे याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे . प्रशासनाने एका दिवसापुरती कारवाई न करता कारवाईमध्ये सातत्य ठेवावे . बेशिस्त वागणाऱ्या नागरिकांनीही शासकीय नियम पाळणे आवश्यक आहे . गेल्यावर्षी कोरोनामुळे व्यवसाय डबघाईला आले होते . परत असताना कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची चर्चा होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना मात्र आमच्या उरात , होतय धडधड ' असे म्हणावयची वेळ आहे . प्रशासनाकडून योग्य नियोजन आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे . वास्तविक पाहता ज्या विभागांवर आदेश अंमलबजावणीची जबाबदारी आहे या विभागाने कारवाईत सातत्य ठेवावे जेणेकरून ' चार दिवस ' चालायचं हे म्हणायची वेळ येऊ नये .

Post a Comment

0 Comments