google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान", चिट्टीशिवाय औषधे देणाऱ्या मेडिकलवर होणार कडक कारवाई

Breaking News

सावधान", चिट्टीशिवाय औषधे देणाऱ्या मेडिकलवर होणार कडक कारवाई

 सोलापूर जिल्ह्यात १२ मेडिकलचा परवाना रद्द; चिट्टीशिवाय औषधे देणाऱ्या मेडिकलवर होणार कडक कारवाई सर्दी, ताप, डोकेदुखी तसेच इतर आजारांवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणाऱ्या मेडिकलवर आता औषध विभागाची कडक नजर राहणार आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.पालकांनो! मंगळवेढ्यात उद्या नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल वर्षभरात प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणार्‍या १२ मेडिकलचे परवाना रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती औषध निरीक्षक तथा औषध विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त नामदेव भालेराव यांनी दिली.वर्षभरापासून कोरोनाचा संकट आहे. सर्दी, ताप खोकला आणि डोकेदुखी सारखी लक्षणे दिसू लागल्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकलकडे धाव घेतात.औषध देण्याची मागणी करत आहेत.रुग्णांच्या मागणीनुसार मेडिकल दुकानदारही औषधे देतात. औषधांचा हा पुरवठा बेकायदा असून, याचा विपरीत परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते कोरोना टेस्ट करून घ्या, असे सांगतात. डॉक्टरांच्या या सकारात्मक सल्ल्याची भीती रुग्णांच्या मनात आहे.त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे न जाता मेडिकल कडून औषधे घेत आहेत. ही बाब चुकीची आहे. कोरोनाला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने आता सर्व मेडिकलचालकांना याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.मेडिकल चालकांनी रुग्णांना प्रिस्क्रिप्शन बंधनकारक करावे. तसा फलक दर्शनी भागात लावावा. तसेच मास्क न घातलेल्या रुग्णांना मेडिकलमध्ये प्रवेश देऊ नये, असे भालेराव यांनी सांगितले आहे.विशेष म्हणजे, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची आकडेवारी रोजच्या रोज प्रशासनाला कळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments