Breaking News

Breaking! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ वेळेत कडक संचारबंदी; ‘हे’ असणार कडक नियम

 Breaking! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ वेळेत कडक संचारबंदी; ‘हे’ असणार कडक नियम कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता सोलापूर शहर व जिल्ह्यात आज २४ फेब्रुवारीपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.ही संचारबंदी ७ मार्चपर्यंत असणार आहे.


याशिवाय ७ मार्चपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.आजपासून ‘हे’ असणार कडक नियम आजपासून सोलापुरात 7 मार्चपर्यंत कडक रात्र संचारबंदी,आज मध्यरात्रीपासून रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी.कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील टेस्टींग वाढविणार, शाळा-महाविद्यालय 7 मार्चपर्यंत बंद राहणार,10 वी आणि 12 चे वर्ग सुरु राहणार.क्रिडांगणावर 7 मार्चपर्यंत कोणत्याही क्रिडा स्पर्धा भरवण्यास बंदी,लग्नसमारंभासाठी 50 लोकांची मर्यादा,कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड सेंटर वाढविणार.कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments