google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महत्वकांक्षी पाणीपुरवठ्याच्या 1 कोटी 87 लाख रूपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता : पाणीपुरवठा सभापती सौ. शोभा घोंगडे

Breaking News

महत्वकांक्षी पाणीपुरवठ्याच्या 1 कोटी 87 लाख रूपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता : पाणीपुरवठा सभापती सौ. शोभा घोंगडे

 महत्वकांक्षी पाणीपुरवठ्याच्या 1 कोटी 87 लाख रूपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता : पाणीपुरवठा सभापती सौ. शोभा घोंगडे 


सांगोला नगरपरिषदेच्या सुमारे 1 कोटी 87 लाख रूपयांच्या पाणीपुरवठ्याच्या विविध कामास सोलापूर जिल्हाधिकारी यांंच्याकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा सभापती सौ. शोभाकाकी घोंगडे यांनी दिली.  या कामासाठी सभापती सौ. शोभाकाकी घोंगडे यांनी आ. शहाजीबापू पाटील यांचेमार्फत प्रशासकीय मंजूरीसाठी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे ही महत्वकांक्षी पाणीपुरवठ्याची कामे मंजूर झाली आहेत.

यामध्ये नगरपरिषद सांगोले अंतर्गत चिंचोली विहीर ते जलशुध्दिकरण कंेंद्र उध्दारण नलिका टाकणे व उपसा यंत्रे बसविणे (सुरक्षात्मक कामांतर्गत) - 1 कोटी 68 लाख 25 हजार 761 रूपये, कुंभार गल्ली येथील सतीच्या विहीरीतून कुंभार गल्ली व रामोशी गल्ली येथील सार्वजनिक शौचालयास शहरातील आडामधून पाणी पुरवठा करणे- 3 लाख 64 हजार 534 रूपये, कोष्टी गल्लीतील आडातून भोपळेरोड व खडतरे गल्ली सार्वजनिक शौचालयास शहरातील आडामधून पाणीपुरवठा करणे - 4 लाख 39 हजार 601 रूपये, आठवडा बाजारातील विहीरतून सनगर गल्ली भिमनगर व साठेनगर येथील सार्वजनिक शौचालयास शहरातील आडामधून पाणी पुरवठा करणे - 4 लाख 34 हजार 127 रूपये, अंबिकादेवी मंदिराजवळील आडातून धनगर गल्ली व आ.क्र. 44 शॉपिंग सेंटर येथील सार्वजनिक शौचालयास शहरातील आडामधून पाणी पुरवठा करणे - 3 लाख 32 हजार 475 रूपये, नगरपरिषद कार्यालयामागील आडावरून तेली गल्ली येथील सार्वजनिक शौचालयास शहरातील आडामधून पाणी पुरवठा करणे - 3 लाख 34 हजार 196 रूपये या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. सदरची कामे ही 14 व्या वित्तआयोगातंर्गत करण्यात येणार असून लवकरच या कामांचे निविदा प्रक्रिया करून ही कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई  माने यांनी दिले

Post a Comment

0 Comments