google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तपासणीचा पोलिसांना नाही अधिकार माहिती अधिकारात वाहतूक निरीक्षकांनी केला खुलासा

Breaking News

तपासणीचा पोलिसांना नाही अधिकार माहिती अधिकारात वाहतूक निरीक्षकांनी केला खुलासा

 वेळापूर , ता . ५ : नाक्यावर , रस्त्यांवर , चौकांमध्ये पोलिसांकडून वाहनधारकांना अडवून दंडात्मक कारवाईची भीती घालून चिरीमिरी उकळण्याचा उद्योग सर्वत्रच दिसून येतो . ग्रामीण भागातील अल्पशिक्षित व अशिक्षित शेतकरी , सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो .


मात्र प्रवासी वाहनांची तपासणी करणे , चावी काढणे , टायरमधील हवा सोडणे असे अधिकार पोलिसांना नाहीत , असा लेखी खुलासा सोलापूर ग्रामीणच्या वाहतूक निरीक्षकांनी केला आहे . वेळापूर ( ता . माळशिरस ) येथील सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्ते तुषार पवार यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागितलेल्या खुलाशावरून सोलापूर जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेने केलेल्या लेखी खुलाशावरून सदर माहिती पुढे आली आहे .याबाबत बोलताना तुषार पवार यांनी सांगितले , की होमगार्ड , पोलिस यांच्याकडून अशिक्षित वाहन चालक , शेतकरी , मजूर आणि शालेय विद्यार्थ्यांकडून गाडी अडवून काहीतरी दोष काढत अधिकार नसताना दंडाची भीती दाखवत पाचशे ते हजार रुपयांची बळजबरीने मागणी केली जाते . वाहनांची चावी काढणे , वाहनांची हवा सोडणे किंवा वाहन पोलिस ठाण्यात नेऊन लावून पैसे उखळून नाहक त्रास , वेळेचा अपव्यय केला जातो . महत्त्वाच्या कामासाठी आठवडा किंवा महिन्यातून एकदा गावात येणाऱ्या शेतकरी आणि मजुरांकडून काबाडकष्ट करून मिळवलेले पैसे घेऊन पिळवणूक केली जाते . आरटीओ ऑफिस किमान शिक्षणाची अट घालत वाहन चालक लायसेन्स नाही , त्यामुळे अशा अडचणींना सतत गरीब व कष्टकरी लोकांनाच जास्त त्रास होतो आहे . त्यामुळे या माहितीचा अधिकार कायद्यान्वये अर्ज दाखल करण्यात आला होता . त्यावर पोलिस निरीक्षक , जिल्हा वाहतूक शाखा , सोलापूर ग्रामीण यांनी अशी पिळवणूक होत असेल तर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे या संदर्भात तक्रार करण्याचे अधिकार जनसामान्यांना आहे . असा खुलासा केला आहे .

Post a Comment

0 Comments