google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रेल्वेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकराच्या प्रयत्नाने सोलापूर जिल्ह्याला 152 कोटी मंजूर ; भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख

Breaking News

रेल्वेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकराच्या प्रयत्नाने सोलापूर जिल्ह्याला 152 कोटी मंजूर ; भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख

 


रेल्वेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकराच्या प्रयत्नाने सोलापूर जिल्ह्याला 152 कोटी मंजूर ; भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख

संसदेच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पीय सन 2021-2022 च्या अधिवेशनात सोलापूर विभागीय रेल्वेचे चेअरमन व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूर जिल्ह्याच्या इतर कामासाठी व रेल्वेच्या कुर्डूवाडीतील (रेल्वे डबा) व्याघन कारखाना पूर्णत्वासाठी 152 कोटी मंजूर करून घेतले सोलापूर जिल्ह्यातील व माढा भागातील रेल्वेच्या नवीन कामे, दुरूस्ती या साठी एकूण जिल्ह्याला 149 कोटी तर कुर्डूवाडी येथील रेल्वे डबा (व्याघन) कारखाना पूर्णत्वास नेण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या कडे करून बजेट मध्ये तरतूद करुन घेतली या कामामध्ये सोलापूर चे खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे या मुळे कुर्डुवाडी येथील रेल्वे डब्याचा ( व्याघन) कारखाना 80 % पूर्ण झाला आहे तो 100% पूर्ण होऊन रेल्वेच्या रिकरूटमेंट बोर्डच्या (RRB) च्या वतीने 500 कामगार भरती होणार आहे. 

ह्या कामगार भरतीत स्थानिकांना संधी द्यावी अशी मागणी रेल्वेचे सोलापूर विभागीय चेअरमन व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडे सदर कारखाना पाहणी दौऱ्यात कुर्डूवाडी ग्रामस्थ व भाजपचे पदाधिकारी यांनी केली होती त्या नुसार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केंद्राच्या रेल्वे विभागाकडे (RRB) कडे तशा आशयाची आग्रही मागणीचा सुध्दा पाठपुरावा सुरू केला आहे. करमाळ्यातील वाशिबें ते भिगवण 27 कि मी चे काम ही मंजूर करून घेतले असून ते काम लवकरच सुरू होणार आहे.अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दिल्याचे अधिकृत सांगितले.

Post a Comment

0 Comments