google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद त्वरीत भरावे

Breaking News

ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद त्वरीत भरावे

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - येथील ग्रामीण रुग्णालयातील अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्त असल्याने प्रभारी वैद्यकीय अधीक्षकावर कामकाज सुरू आहे . तसेच ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधांची दुरावस्था , तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे , खासगी रुग्णालयातील भरमसाट शुल्कामुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वैद्यकीय अधिक्षक पद लवकरात लवकर भरावे , अशी मागणी जोर धरू लागली आहे . सांगोला ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकासह तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत . मात्र , गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद भरले नसल्याने प्रभारी वैद्यकीय अधीक्षकावर कामकाज सुरू आहे .वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीनपैकी दोन पदे भरली असून एक वैद्यकीय अधिकारी एक महिन्यापासून रजेवर असल्याने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार एकाच डॉक्टरवर सुरू आहे

. कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे . ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकासह वैद्यकीय अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदा अभावी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत , तर कधी कधी रुग्णांना डॉक्टरांची वाट पाहत बसावे लागते . त्यामुळे सध्या ग्रामीण रुग्णालय सलाईनवर आहे . ग्रामीण रुग्णालयात लोकप्रतिनिधींनी सल्लागार समिती व रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांची नियुक्ती केली आहे , मात्र तसे फलक लावण्याकडे दुर्लक्ष झाले आहे .

Post a Comment

0 Comments