google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तालुक्यात सार्वजनिक शिवजयंतीसाठी परवानगी मिळणार नाही- पो.नि.भगवान निंबाळकर सांगोला येथे शिवजयंती व सरपंच निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न

Breaking News

तालुक्यात सार्वजनिक शिवजयंतीसाठी परवानगी मिळणार नाही- पो.नि.भगवान निंबाळकर सांगोला येथे शिवजयंती व सरपंच निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न

 सांगोला ( प्रतिनिधी ) : सांगोला तालुक्यात कोणालाही सार्वजनिक शिवजयंतीसाठी परवानगी मिळणारनसून सार्वजनिक ठिकाणी कोणालाही गर्दी करता येणार नाही . वाजंत्री , लेझीम , डिजे याचा वापर न करतासर्वांनी अत्यंत साधेपणानी शिवजयंती साजरी करावी.असे आवाहन पो.नि.भगवान निंबाळकर यांनी केले .


काल शनिवार दि .१३ फेब्रुवारी रोजी सांगोला येथील बचत भवन पंचायत समिती येथे शिवजयंती व सरपंच निवडणुकी संदर्भात पो.नि.भगवान निंबाळकर यांच्याउपस्थितीत वैठक संपन्न झाली . यावेळी तालुक्यातील विविध गावातील नागरिक , विविध पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते ,नूतन ग्रा.पं.सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . पुढे बोलताना पो.नि.भगवान निंबाळकर म्हणाले , सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत . त्याचप्रमाणे सरपंच निवडणुकाही शांततेत पार पाडण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा .सरपंच निवडणुकीत फक्त सदस्यांना सहभाग नोंदविता येणार आहे . गावातील इतर कोणत्याही नागरिकाला , पॅनेलप्रमुखांना सरपंच निवडणुकीत सहभाग घेता येणार नाही . इतर कोणाचाही हस्तक्षेप चालणार नसून कोणीही गडबड , दादागिरी , गुंडागिरी करणार नाही . असे आढळल्यास कारवाई असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला . निवडणुकीच्या कालावधीत वारंवारगन्हे करणाऱ्यांना यापुढील काळात निवडणुकीच्याकालावधीत तडीपार करण्याचा इशारा देत सोलापूर , सांगली , सातारा या जिल्ह्यातून तडीपार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .सरपंच निवडणुक निकालानंतर कोणीही मिरवणुक काढू नये , तशी परवानगी मिळणार नाही . सरपंच निवडणुकीदरम्यान प्रत्येक गावात | आमचा बंदोवस्त राहणार असून | संवेदनशील गावासाठी बाहेरचा बंदोवस्त मागविण्यात येणार आहे . भांडण व वादविवाद होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणे गरजेचेअसून ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे . सरपंच | निवडणुकीच्या कालावधीत सदस्य पळवापळवीचा प्रकार कोणी केल्यास किपिंगचा गुन्हादाखल करणार असल्याचा इशारा पो.नि.भगवान निवाळकर यांनी | दिला .

Post a Comment

0 Comments