सांगोला / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री ना.विनायक राऊत यांनी वेळोवेळी महाराष्ट्रातील तमाम जनतेला विज बिलासंदर्भात खोटी आश्वासने देऊन फसवणूक केली आहे .
त्यांच्याविरोधात यापूर्वीच फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा | | म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन दिलेले आहेत . त्याचाच पुढचा भाग म्हणून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रातील जनतेला सोबत | घेऊन तसेच सामाजिक संघटना इतर सेवाभावी संघटना यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महावितरणच्या विरोधात व शासनाच्या विरोधात भव्य मोर्चाकाढणार आहे . महाराष्ट्र शासनाने जनतेचा रोष ओढवून न घेता कोरोनाच्या संकट काळातील बिल तात्काळ माफ करावीत व चुकीची विज बिले दुरुस्त करून द्यावीत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगोला तालुक्याच्या वतीने दिलीप ( बापू ) धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी महावितरण विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे . अशी माहिती मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर यांनी दिली .


0 Comments