google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह अशी ऑफर अमरावतीमध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल ; राज्यात खळबळ

Breaking News

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह अशी ऑफर अमरावतीमध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल ; राज्यात खळबळ

 दि .२५ : कोरोना अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह अशी ऑफर अमरावती जिल्ह्यातील एका लॅबकडून दिली जात असल्याचं समोर आलं आहे . आज एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली .


ही क्लिप केव्हाची आणि कुठली हे जरी स्पष्ट नसलं तरी अमरावतीत चर्चेचा विषय ठरत आहे . या ऑडिओ क्लिपमध्ये लॅब डॉक्टर एका युवकाला सांगतोय की , ज्यांनी पेटीएमचा कोरोना इन्शुरन्स काढला आहे अशा तरुणांचे नंबर पाठव , आपण त्याला पॉझिटिव्हचा रिपोर्ट देऊ आणि चार दिवस भर्ती करु आणि त्यांनतर त्याला मिळवून देऊ .

काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी अमरावतीत एक रैकेट सक्रिय असल्याचा गौप्यस्फोट केला होता , या ऑडिओ क्लिपमुळे त्याला दुजोरा मिळाला आहे . तसंच पुण्याच्या | एका इन्शुरन्स कंपनीने अमरावती आणि अकोला येथे साडेतीन कोटी | रुपये कोरोना इन्शुरन्स क्लेम मंजूर | केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . | याविषयी बोलताना प्रशांत साबळेम्हणाले होते की , कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे तपासण्यासाठी मी लॅबमध्ये गेलो . त्यावेळी एका डॉक्टरने तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह | करायचा की निगेटिव्ह अशी | विचारणा केली . त्यावेळी ही बाब माझ्या लक्षात आली नाही . त्यांनी हे शब्द कसे काय वापरले असं मला दोन दिवसांनी लक्षात आलं . विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी | चर्चा केली असता , पॉझिटिव्ह नसताना रिपोर्ट पॉझिटिव्ह देतात .म्हणून ही चौदा दिवस क्वॉरन्टीन करतात , पगारी रजा घेतात , तीन हजार रुपये भरुन कोरोना विमा पॉलिसीमधून निम्मे पैसे वाटून घेतात . जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा मांडला . दुसरीकडे भाजपने या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे . चौकशी करुन कारवाई केली जाईल , असं आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितलं आहे

Post a Comment

0 Comments