google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या दरोडेखोरांच्या सांगोला पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत .

Breaking News

वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या दरोडेखोरांच्या सांगोला पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत .

 सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : थकीत घरभाडे मागणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाला जबर मारहाण करीत स्मशानभूमीत नेऊन जाळून मारण्याची धमकी देत जबरदस्तीने कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या दरोडेखोरांच्या सांगोला पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत .


रिपब्लिकन सेनेचा युवक तालुकाध्यक्ष कडूबा निवृत्ती खरात सध्या रा.एखतपुर रोड , सांगोला ( कायमचा पत्ता मसनतपूर , एमआयडीसी एरिया चिखलठाणा औरंगाबाद ) . रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष पाराप्पा संभाजी ढावरे सध्या रा.वासूद ता.सांगोला ( कायमचा पत्ता कचरेवाडी ता.मंगळवेढा ) , विनोद पोपट ढोबळे रा.बनकरवस्ती सांगोला यांच्यासह - एकास पोलिसांनी अटक केली आहे . T एखतपुर येथील सेवानिवृत्त - शिक्षक शिवाजी पांडुरंग नवले यांच्या - अष्टविनायक अपार्टमेंटमध्ये कडुबा निवृत्ती - खरात व पारा प्पा संभाजी ढावरे हे दोघेजण । भाड्याने राहण्यास असून त्यांचे घरभाडे - थकीत राहिले होते . शुक्रवार १ ९ फेब्रुवारी रोजी कडूबा खरात व पाराप्पा ढावरे यांनीफ्लॅटमालक शिवाजी नवले यांना फोन करून मार्केट यार्डासमोर बोलवून घेतले . त्या ठिकाणी आणखी पाच साथीदारांना बोलावून घेत तू माझ्या पत्नीला फोन का करतो , तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे म्हणून नवले यांना मारहाण केली . त्यानंतर त्यांनी शिवाजी नवले यांचे अपहरण करून जबरदस्तीने छोटा हत्ती टेम्पोत बसवून स्मशानभूमीत घेऊन जात लाकडी दांडक्याने मारहाण करून तुला जाळण्यासाठी लाकडे आणली आहेत अशी भीती दाखवत वीस लाख रुपये खंडणी दे किंवा एक फ्लॅट नावावर करून देण्याची मागणी करत जिवंत जाळण्याची धमकी दिली . त्यानंतर नवले यांच्या खिशातून मोबाईल काढून घेऊन त्यांच्या फोन पेवरून २ हजार रुपये काढून घेतले . त्यांनी एवढ्यावरच न थांबता शिवाजी नवले यांना जबरदस्तीने त्याच टेम्पोतून फुले चौकात नेऊन त्या ठिकाणी १०० रुपयांचा स्टॅम्प खरेदी करून पंढरपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन दारूसाठी पैसे घेत खंडणीच्या रकमेची मागणी केली . तसेच त्यांनी शिवाजी नवले यांचा मुलगा राजेंद्र यास फोन करून त्याच्याकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितली . सांगोला पोलीस ठाण्यात शिवाजी नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात कडूबा खरात , ढोबळे , ढावरे यांच्यासह ४ अनोळखी इसमाविरुद्ध दरोड्याचा , अपहरणाचा व ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला होता .या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर व त्यांच्या पथकाने शिताफीने आरोपी कडूबा खरात , पाराप्पा ढावरे , विनोद ढोबळे यांना अटक केली . तसेच इतर चार अनोळखी आरोपींपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . सदर आरोपींपैकी कडूबा खरात हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून इतर आरोपींचे रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत याची पाहणी करून तडीपार , मोक्का अशी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली .

Post a Comment

0 Comments