google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पन्नास तरुणांची बायको बनलेल्या महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या – या टोळीतील नऊ महिला आणि दोन पुरुष पोलिसांच्या ताब्यात

Breaking News

पन्नास तरुणांची बायको बनलेल्या महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या – या टोळीतील नऊ महिला आणि दोन पुरुष पोलिसांच्या ताब्यात

 पन्नास तरुणांची बायको बनलेल्या महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या – या टोळीतील नऊ महिला आणि दोन पुरुष पोलिसांच्या ताब्यात


पुणे – लग्नाळू  मुलगा शोधून त्याला चांगली मुलगी मिळवून देतो या आमिषाखाली गाठायचे. त्याच्याशी लग्न करायचे त्या आधी साहित्य खरेदी च्या नावावर त्याच्याकडून नगदी रक्कम उकळायची. लग्न केल्यावर बायको म्हणून दोन दिवस नांदायचे आणि त्यांनतर कोणते ना कोणते कारण सांगून घरातील नगदी आणि सोन्याचे व चांदीचे दागिने घेऊन पोबारा करायचा  हा त्यांचा गोरखधंदा होता. बरे या दोन दिवसात काहीही कारण सांगून नवऱ्या पासून दूर राहायचे ही त्यांची पध्दत होती.पण पुणे ग्रामीण पोलिसांनी योग्य रित्या तपास करून या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.ज्योती रवींद्र पाटील(३५)  असे या ठगबाज महिलेचे नाव आहे.ज्योती आणि तिच्या साथीदारांनी मिळून आजपर्यंत जवळपास ,५० लोकांना गंडा घातला आहे. या टोळीतील सदस्यांनी नाशिक, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, कोल्हापूर येथील युवकांना आणि लग्नाळू लोकांना गंडा घातला आहे.– अशी कचाट्यात आली  टोळी – ज्योती आणि तिच्या टोळक्याने एका तरुणाला गाठून लग्नाच्या नावावर त्याच्यापासून अडीच लाख रुपाये घेतले होते.लग्न झाल्यावर ती बायको म्हणून दोन दिवस राहिली आणि त्यानंतर माहेरी जाऊन येते म्हणून घरातील नगदी आणि लग्नातील मिळालेले दागिने घेऊन पाल काढला. तरुणाने नंतर मोबाईल वर संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर नंबर लागत नव्हता. तथाकथित बायको च्या घरी जाऊन पाहिले तर तेथे कुलूप होते.तरुणाला आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने ग्रामीण पोलीसात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी चतुराईने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने ५० लोकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसानी या टोळीकडून गंडविण्यात आलक्या लोकांना समोर येऊन तक्रारी देण्याची विनंती केली आहे.पण लाजेखातर अल्प प्रमाणात लोक समोर येत आहेत.

Post a Comment

0 Comments