google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तालुक्यातील १७ हजारांवर वीजग्राहकांनी एप्रिल २०२० नंतर एकदाही भरले नाही वीजबिल थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे ; महावितरणकडून आवाहन

Breaking News

तालुक्यातील १७ हजारांवर वीजग्राहकांनी एप्रिल २०२० नंतर एकदाही भरले नाही वीजबिल थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे ; महावितरणकडून आवाहन

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - १ एप्रिल २०२० ते ३० जानेवारी २०२१ पर्यंत १७ हजार ३३७ ग्राहकांनी ९ कोटी ५० लाख रुपये वीजबील थकविले आहे . यामध्ये १६ हजार ३८ घरगुती ग्राहकांचे ७ कोटी ४५ लाख , १ हजार १४८ व्यावसायिक ग्राहकांचे १ कोटी ६५ लाख तर १५१ औद्योगिक ग्राहकांचे ३१ लाख रुपये वीजबील थकीत असल्याची माहिती सांगोला विजवितरणचे अभियंता आनंद पवार यांनी दिली


आहे . लॉकडाऊनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व या काळात महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी १० महिन्यांच्या काळात वीजबिल भरण्याचा तगादा न लावता अखंडित वीजपुरवठा केला . त्यातच सांगोला तालुक्यात घरगुती , व्यावसायिक व औद्योगिकच्या १ हजार १७३ ग्राहकांनी एप्रिल २०२० नंतर एकदाहीवीजबिल भरले नसल्याने वीजदेयकापोटी त्यांच्याकडे १ कोटी ५० लाख रुपये थकीत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे . अखंडित वीजसेवा देणारी महावितरणच आर्थिक संकटातून जात असल्याने थकवाकीदार ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे , असे आवाहन वीज वितरणमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे . कोरोनाच्या कालावधीपासून गेल्या १० महिने अंखडित विजपुरवठा करण्यात आला होता . या ग्राहकांनी एवढ्या दिवस विज बिल भरले नाही तरीदेखील आतापर्यंत वीज कनेक्शन बंद करण्यात आले नाही . आता हा झालेला भलामोठा डोंगर कमी करणे गरजेचे असून सर्व ग्राहकांनी वीजविल भरावे . कोणत्या ग्राहकांना काही अडचण असतील तर महावितरण कंपनीशी साधावा , असे आवाहनही त्यांनी केले आहे . मागील दहा महिन्यांत वाढलेल्या थकबाकीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीने भविष्यात महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.विजबील न भरलेल्या ग्राहकांना नोटीसीही देण्यात आल्या असून यापुढील काळात यांचे कनेक्शन कट करण्याची शक्यता असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे . वीज ग्राहक हे महावितरणचे दैवत असून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हेल्प डेस्कद्वारे वीजबिलासबंधी तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे , याबद्दल ग्राहकांनी समाधानही व्यक्त केलेले आहे . तेव्हा कोणत्याही भूलथापांना बळी न पड़ता थकबाकीदार ग्राहकांनी आपले वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे

Post a Comment

0 Comments