google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील शासकीय बँक कर्मचा-यांच्या आडमुठ्या भुमिकेचा नागरिकांना मनस्ताप ; कर्ज देण्यास,खाते उघडण्यास होतेय टाळाटाळ !

Breaking News

सांगोल्यातील शासकीय बँक कर्मचा-यांच्या आडमुठ्या भुमिकेचा नागरिकांना मनस्ताप ; कर्ज देण्यास,खाते उघडण्यास होतेय टाळाटाळ !

 

सांगोल्यातील शासकीय बँक कर्मचा-यांच्या आडमुठ्या भुमिकेचा नागरिकांना मनस्ताप ; कर्ज देण्यास,खाते उघडण्यास होतेय टाळाटाळ !

सांगोला शहरात असणाऱ्या भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक,युनियन बँकेतील अधिकारी, कर्मचारी हे नागरिकांना नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी मध्ये दिवसोंदिवस वाढत चालल्या आहेत. मुख्य शाखेत खाते उघडण्यासाठी आलेल्या नागरिकांना मिनी शाखेत खाते उघडण्यास सांगितले जाते. कर्ज देतो म्हणून फाईल तयार करून घेतल्या जातात. 

फाईल तयार करण्यासाठी नागरिकांना हजारों रुपये खर्च करावा लागतो. फाईल तयार होवून ही कर्ज देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली जात आहे.या सर्व प्रकारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकारच्या शासकीय बँकेकडून कर्ज प्रकरणे मिळत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने खाजगी सावरकर किंवा फायनान्स कडून कर्ज घ्यावे लागते.

शासकीय बँकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या या आडमुठ्या कारभारामुळे सांगोला तालुक्यातील नागरिक , महिला बचत गटांच्या माध्यमातून कर्ज घेत आहेत. 

या बचत गटांच्या उचललेल्या कर्जाची परतफेड करताना तालुक्यातील नागरिक, महिलांना मोठी अडचण निर्माण होत आहे.शासकीय बँकेचे कर्ज मिळत नसल्याने तालुक्यातील महिला मोठ्या प्रमाणावर बचत गटाच्या माध्यमातून उचललेल्या फायनान्स च्या विळख्यात सापडत आहेत.

Post a Comment

0 Comments