तुझ्यामुळे माझा मुलगा आत ' गेला ... तो आज ना उद्या सुटून येईलच ... आता तुझी तर इज्जत गेलेलीच आहे ... मुकाट्याने बलात्काराची फिर्याद मागे घे , नाहीतर तुला बघतो ... तुझी हत्याच करतो ... , अशी बलात्कारातील आरोपीच्या वडिलांची धमकी ... आधीच गावात बेइज्जत झालेली ; त्यात पुन्हा जिवे मारण्याची धमकी ... अपमानित जीवन जगावं की अपमानासकट स्वत : ला संपवावं .. ? काहीच कळेनाशी झालेली पिडीत महिला . वरून तिच्या नवऱ्यालाही धमकी ... बाहेरही जाता येईना आणि घरातही बसता येईना ... शेवटी वैतागलेल्या पिडीत विहिरीत उडी घेऊन स्वत : लाच संपवलं
हा प्रकार घडला आहे सांगोला तालुक्यातील वाकीशिवणी या गावी .याप्रकरणी पहिल्यांदा बलात्काराचा आणि त्यानंतर बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दुसरा असे
दोन गुन्हे सांगोला पोलीस ठाण्यात दाखल झाले असून आत्तापर्यंत फक्त बलात्काऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . आत्महत्येस प्रवृत्त करणारे मात्र मोकाट आहेत . पांडुरंग तुकाराम हांडे त्याचा मुलगा योगेश हांडे , घनाजी धुळा हांडे आणि संजय ऊर्फ सोन्या हांडे ( सर्व रा . वाकीशिवणे , ता . सांगोला ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून सद्या ते फरार आहेत . मयत विवाहितेच्या पतीने सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केली असून सहाय्यक निरीक्षक हुले पुढील तपास करीत आहेत .


0 Comments