आता यापुढे ग्रामपंचायत सदस्य , सरपंच , उपसरपंच व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य यांचे एक इंचसुद्धा अतिक्रमण असल्यास त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे पद रिक्त करण्याच्या सूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकान्यांना दिल्या आहेत
. सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून | राज्यात बऱ्याच जिल्ह्यात ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या आहेत . त्यामध्ये निवडून आलेले सदस्य हे जबाबदार नागरिक असून त्यांचा जनतेने आदर्श घ्यावा , या हेतूने त्यांचे वर्तन व राहणीमानही तसेच असायला हवे . कारण त्याचे समाजमनावर प्रतिबिंब पडते . हाच उद्देश समोर ठेवून न्यायालयाने तत्काळ असा आदेश काढला आहे . यापुढे कोणताही ग्रामपंचायत सदस्य व त्याच्या कुटुंबातील भाऊ , वडील यांचे इंचभर सुद्धा अतिक्रमण असल्यास त्यांना तत्काळ पदावरून काढून टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत . निर्णयामुळे जनतेत जरी आनंद असला तरी बन्याच ग्रामपंचायत सदस्यांना डोकेदुखी ठरणार आहे .| कारण बऱ्या सदस्यांचे घर , खोल्या , घरासमोर असणारे ओटे , गावात | इतरत्र असणारे अतिक्रमण तत्काळ | काढावे लागणार आहे . काही सदस्यांची घरे मुख्य रस्त्यावर असून त्यांनी गावनकाशात असणान्या रस्त्यावर बांधकाम केल्याचे | शासनाच्या निदर्शनास आले आहे . | अशा सदस्यांनी मुख्य रस्ता सोडून | असलेले अतिक्रमण , घरे , खोल्या , ओटे तात्काळ स्वखचनि पाडले | नाहीत तर शासन त्यांच्यावर | फौजदारी गुन्हे दाखल करून | पदावरून खारीज करणार आहे . तसेच ज्या सदस्यांनी उमेदवारी दाखल करताना दिलेले संपत्तीचे | विवरण , शौचालय , अतिक्रमण | नसत्याचे हमीपत्र हे दस्तावेज सादर केले आहेत , त्या सर्वांच्या प्रति | जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पाठवण्यात आल्या असून त्यावरही संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत


0 Comments