सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) जिल्ह्यात हिंस्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमधून भितीचे वातावरण पसरले असताना कमलापूर ता . सांगोला येथील अनुसेमळा याठिकाणी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक भल्या मोठ्या रानगव्याने धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण पसरले आहे
. दरम्यान रानगव्याने धडक दिल्याने म्हैस जखमी झाल्याची घटना घडली आहे . दरम्यान रात्रीच्या सुमारास रानगव्याने वासूद गावाकडे पलायन केल्याने वनविभागाच्या अधिकारी , कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे.सोलापूर जिल्ह्यातील करमाळा , मोहोळ , माढा , पंढरपूर आदी तालुक्यात हिंस्त्र प्राण्याने जनावरे ,नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . अशातच सांगोला तालुक्यातील महूद ठोंबरेवाडी , महिम , कारंडेवाडी परिसरात हिंस प्राण्याने हल्ला केल्यामुळे शेळ्या मेंढ्या जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्याने घडल्याने शेतकरी , ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण आहे . दरम्यान सोमवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कमलापूर अंतर्गत अनुसेमळा येथे विनायक अनुसे या तरुणास त्यांच्या मक्याच्या पिकात भल्या मोठ्या रानगव्याचे दर्शन झाले . रानगव्यांने अचानक सैरभैर धुडगूस घालत असताना त्याने विनायक अनुसेच्या म्हशीला धडक दिल्याने म्हैस जखमी झाली आहे . तर रानगवा परिसरातील पिकातून सैरभैर पळत सुटल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले . ग्रामस्थांनी त्या रानगव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता तो पिकात लपून बसला आहे . दरम्यान कमलापूर परिसरात रानगवा आला असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी , कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे . वनविभागाकडून त्या रानगव्यास पकडून कमलापूर भयमुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .


0 Comments