उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 75 ग्रामपंचायतीचे चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत संपन्न
सांगोला,दि.22 : सांगोला तालुक्यातील 75 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज रोजी नगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर सभाग्रहात दुपारी एक वाजता नव्याने आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले असून, त्यामध्ये काही गावात बदल झाला असल्याची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली.तालुक्यात 76 ग्रामपंचायती असून मेथवडे ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती साठी आहे उर्वरित 75 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज रोजी होऊन सर्वसाधारण सरपंच पदासाठी 20 तर महिलांसाठी 19 नागरीकांचा मागास प्रवर्ग साठी पुरुष 10 तर महिला साठी 11, अनुसूचित जाती पुरुष सात तर महिलांसाठी आठ असे पुरुषासाठी सदोतीस तर महिलांसाठी 38 सरपंच पदे मिळणार आहेत.सर्वसाधारण सरपंच पदासाठी ग्रामपंचायती पुढील प्रमाणे महिम ,कटफळ, इटकी, लक्ष्मी नगर, बागलवाडी, शिवणे, चिंचोली, शिरभावी, देवळे, सावे, जवळा, कमलापूर, लोणविरे, सोमेवाडी, किडबिसरी, तिप्पेहळी, जुजारपूर, हंगिर्गे, हटकर, मंगेवाडी, वाटंबरे तर सर्वसाधारण सरपंच पदासाठी महिला ग्रामपंचायती महूद, अचकदाणि, एकतपुर, मेडशिंगी, वाकि, घेरडी, अकोला, अजनाळे, उदनवाडी, मानेगाव, बुद्याळ, हातीद, डोंगरगाव, घेरडी, चिक-महूद, बामणी, आलेगाव, वासुद, राजुरी, पाचेगाव खुर्द,
नागरिकाचा मागास वर्ग पुरुष ग्रामपंचायती जुनोनी, धायटी, बलवडी, पारे, खवासपूर, वाकी, शिवने, चिनके, डिकसळ, लोटेवाडी, सोनलवाडी,तर नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी ग्रामपंचायती पाचेगाव बुद्रुक, वाडेगाव, वझरे, चोपडी, कोळा, सोनंद, नराळे, मांजरी, गोडवाडी, नाझरे, अनकढाळ अनुसूचित जाती पुरुष ग्रामपंचायती यलमार, मंगेवाडी, संगेवाडी, हलदहिवडी, गायगव्हाण, कडलास, निजामपूर, आगलावेवाडी,अनुसूचित जाती महिलासाठी ग्रामपंचायती वाणीचिंचाळे, खिलारवाडी, हनुमंतगाव, तरंगेवाडी, राजापूर, बुरंगे वाडी, भोपसेवाडी, गळवेवाडी या ग्रामपंचायती होत.या ग्रामपंचायत सोडती प्रसंगी उपजिल्हाधिकारी अंकित तहसीलदार अभिजीत पाटील, गट विकास अधिकारी संतोष राऊत, निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे, निवडणूक नायब तहसीलदार बी सी कोळी तसेच तलाठी ग्रामसेवक महसूल खात्याचे कर्मचारी विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी तालुक्यातील राजकीय पक्षांचे नेतेमंडळी ग्रामपंचायतीचे सदस्य हे उपस्थित होते.चिठ्ठीद्वारे सोडत विद्या मंदिर हायस्कूल मधील 14 वर्षाचा विद्यार्थी दत्तात्रय शिवाजी गावडे यांनी आरक्षणाच्या चिठ्ठी काढली. तालुक्यात आरक्षण सोडत काढण्यात आली त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे सरपंच पदाचे आरक्षण पंधरा गावांमध्ये टाकले असून त्यातील सहा गावांमध्ये अनुसूचित जातीचे सदस्य नाही त्यामुळे त्या जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे अनुसूचित जातीच्या सरपंच पदावर अन्याय होणार आहे अशी खंत रिपाई आठवले गटाचे तालुका अध्यक्ष खंडू सातपुते यांनी व्यक्त केली.


0 Comments