सांगोला ( प्रतिनिधी ) : - पोलीसांनी एस.एस.मोबाईल शॉपी चोरी प्रकरणातील २ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ६ लाख ८ हजार ८३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
. सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते , अप्पर पोलीस अधिक्षक श्री.अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील , स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा राजेश गायकवाड , पोहवा विजय भरले , पोहवा मोहन मनसावले , पोना.रवि माने , पोना.हरी पांढरे , पोकॉ.सचिन गायकवाड , पोकॉ.अरुण केंद्रे , पोकॉ.सचिन मागाडे व सायबर शाखेचे पो.कॉ.रवि हाटखिळे यांनी तपासासाठी महत्वाची भूमिका बजाविली .
दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी फिर्यादी विजय कुंडलिक राऊत , रा . राऊत मळा , ता.सांगोला यांचे सांगोला शहरातील नेहरू चौक असणाऱ्या राजाराम कॉम्पलेक्समधील गाळा नं ८ व ९ मध्ये असणारे एस.एस.मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे . सदर दुकानाचे लोखंडी शटर गॅस कटरच्या सहाय्याने कट करून त्यातून दुकानात दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून दुकानातील आय फोन , सॅमसंग , नोकिया , वीवो , ओप्पो , एमआय , रियलमी अशा कंपनीचे नवीन मोबाईल लिनोवो कंपनीचे २ टॅब , ब्ल्यूटूथ , स्मार्टवॉच , स्नुप , हेडफोन , ओटीजी , पॉवर बॅन्क असे .१० लाख ६ ९ हजार ०४४ / -व रोख रक्कम १ लाख ६२ हजार असा एकूण १२ लाख ३१ हजार ४४ रु चा ऐवज चोरुन नेल्याबाबत सांगोला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखला होता . सदर गुन्हयामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल व मोबाईल साहीत्य चोरीस गेल्याने सदर गुन्हयाचा सविस्तर तपास करण्याबाबत मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते . त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . सर्जेराव पाटील यांनी स्था.गु.शा पोलीस उपनिरीक्षक श्री.अमित सिद पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक नेमून सदर गुन्हयाचा तपास करण्यास आदेशीत केले होते . त्याप्रमाणे पोसई अमित सिदपाटील व स्टाफ यांनी पुणे , मुंबई , सांगोला व आजूबाजूच्या भागामध्ये फिरून गोपनिय बातमीदार यांचेकडून सदरचा गुन्हा करणारे गुन्हेगारांची माहिती प्राप्त केली . त्यानुसार सदर गुन्हयातील दोन आरोपीना अटक करून त्यांचेकडून गुन्हयातील ३३ मोबाईल व १ टॅब त्यांची एकुण किंमत ६ लाख ८ हजार ८३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरच्या कामगिरीबद्दल पोलीसांचे कौतुक व अभिनंदन होत आहे .



0 Comments