google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदेमार्फत ५०१ वृक्ष लागवड करून पर्यावरणपूरक शिवजयंती उत्साहात साजरी सांगोला शहराची पर्यावरण पूरक शहराकडे वाटचाल - आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

सांगोला नगरपरिषदेमार्फत ५०१ वृक्ष लागवड करून पर्यावरणपूरक शिवजयंती उत्साहात साजरी सांगोला शहराची पर्यावरण पूरक शहराकडे वाटचाल - आमदार शहाजीबापू पाटील

 सांगोला ( प्रतिनिधी ) : शिवजयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी ५०१ वृक्ष लागवड करून सांगोला नगरपरिषदेमार्फत पर्यावरण संवर्धनाचा नारा दिला गेला . या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची सुरुवात इदगाह मैदाना शेजारी सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापु पाटील यांच्या शुभहस्ते वसुंधरा अभियानाची सांगोला नगरपरिषद मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे


. याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरास पर्यावरण पूरक हरित शहर बनवण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेने ७ जानेवारी २०२१ रोजी सांगोला वृक्ष बँक या अभिनव संकल्पनेची सुरुवात केली . यात शहरात नागरिकांकर यादांची रोपेवटीशिवजयंती निमित्त वृक्ष बँकेत प्राप्त झालेल्या ५०१ वृक्षांची लागवड मा.आमदार शहाजी बापू पाटील , नगराध्यक्षा सौ.राणिताई माने , उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर , भाऊसाहेब रूपनर , रफिक भाई नदाफ , मुख्याधिकारी कैलास केंद्रे , कार्यालयीन अधीक्षक अभिलाषानिंबाळकर , इतर सर्व नगरसेवक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत इदगाह मैदाना शेजारी , टॉवन हॉल व बौद्ध सांस्कृतिक भवन या ठिकाणी केली गेली . यावेळी नगरपरिषदेमार्फत आमदार शहाजी बापू पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली गेली . बापूंनी नगरपरिषदेच्या वृक्ष बँकेस ५०० ट्री गार्ड देण्याची घोषणा केली . या ५०१ वृक्षांची लागवडीसाठी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता श्री.तुकाराम माने यांनी माघील १० दिवसांपासून उत्तम नियोजन करून शहरातील ८ ठिकाणी ५०१ खड्डे खोदून त्यात काळी माती व खत भरून घेतला होता . सर्व नगरसेवक , अधिकारी , कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नाने आमदार शहाजी बापू यांच्या | उपस्थितीत पर्यावरण पूरक शिवजयंती चा अनोखा व सुंदर कार्यक्रम पार पडला .

Post a Comment

0 Comments