google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाढेगाव येथील माणनदीत मासेमारी करणाऱ्यांची मोठी आर्थिक उलाढाल वाढेगांव येथील माणनदीच्या पाण्यात मच्छीमाऱ्यांना साडेचार किलोचा सापडलेला मासा .

Breaking News

वाढेगाव येथील माणनदीत मासेमारी करणाऱ्यांची मोठी आर्थिक उलाढाल वाढेगांव येथील माणनदीच्या पाण्यात मच्छीमाऱ्यांना साडेचार किलोचा सापडलेला मासा .

 वाढेगांव ( वार्ताहर ) दि .१८ - वाढेगांव ता . सांगोला येथील माण नदीत मोठ्या प्रमाणात मासे आल्याने मासेमारी करणाऱ्यांची मोठी आर्थिक उलाढाल होत आहे .


तर मासे घेण्यासाठी या ठिकाणी ग्राहकांची गर्दी हो असते . वाढेगांव येथे माण , कोरडा व अफुका या नद्यांचा संगम होतो . नर्द स्वच्छतेमुळे नदीचे पात्र मोठे झाले असून मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणीसाठा झाला आहे . गतवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला . त्यामुळे माण , कोरडा व अफ्रुका या तीनही नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं होते . माणनदीचे पाणी हे उगमस्थळापासून बऱ्याच वर्षानी त्रिवेणी संगमापर्यंत आले होते . त्यामुळे दूरवरून आलेल्या माणनदीच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे मासे आले आहेत . मच्छीमारी करणारे दररोज सकाळी सायंकाळ नदीतील मासे जाळीद्वारे काढून विक्रीसाठी ठेवतात . रव , गासकापर निरगील , कटला , सपरनेस , चिलाप , गुगळी अशा विविध प्रकारच्या जाती मासे घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते . दिवसाकाठी वीस तीस किलो पर्यंत नदीतून मासे काढले जातात , तर २०० ते २५० रुपट किलो दराने या माश्यांची विक्री होत असते . नदीत जास्त वजनाचे मासेह सापडत असल्याचे मासेमारी करणारांकडून सांगण्यात आले . मासेमारी करणाऱ्यांना या व्यवसायातून चांगल्या प्रकारचे आर्थिव उत्पन्न मिळत आहे . एकेकाळी कोरडीठक असणाऱ्या या नदीतून शेतीच्य पाण्याच्या उपलब्धतेबरोबरच मासेमारीचा व्यवसाय ही उत्तमप्रकारे चाल आहे . सद्या नदीतील पाणीपातळी कमी होत आहे . त्यामुळे मासे खाण्यासाठी विविध पक्षीही या ठिकाणी आल्याचे पहावयास मिळत आहे .

Post a Comment

0 Comments