सांगोला ( प्रतिनिधी ) : दुचाकीवरून अवैधरित्या दारू घेऊन जाणाऱ्यावर कारवाई करून ९ हजार ९ ८४ रुपयाच्या १ ९ २ संत्रा दारू बाटल्या जप्त केल्याची घटना रविवार दि .२१ फेब्रुवारी रोजी दु .२ वा . च्या सुमारास सांगोला - वाढेगाव रोडवरील मंगलकार्यालया जवळ घडली आहे
. पो.ना.धनंजय इरकर हे सांगोला - वाढेगाव रोडवर धनंजय इरकर , तुकाराम व्हरे , पवार , संभाजी भोसले हे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना एकजण दुचाकीवर पाठीमागे पोत्यात काहीतरी घेऊन जात असताना पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता पोत्यात ४ बॉक्स संत्रा दारू असल्याचे निदर्शनास आले . याबाबत पोलिसांनी २० हजार रुपयांची स्प्लेंडर व ९ हजार ९ ८४ रु.ची दारू असा २ ९ हजार ९ ८४ रु.चा मुद्देमाल जप्त करून ६५ ई नुसार कारवाई केली आहे .


0 Comments