मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 फेब्रुवारी) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद
सांगोला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. तसेच महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासा ठी लॉकडाऊन लावणार की नाही याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. 'नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम पाळले नाही आणि संसर्गाचं प्रमाण असंच सुरु राहिल्यास आपल्याला राज्यात लॉकडाऊन करावा लागेल,' असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले.पुढचे 8 दिवस त्यासाठी महत्वाचे असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सुचित केलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही याचा निर्णय पुढच्या आठ दिवसात होऊ शकतो. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील असं मुख्ममंत्री म्हणालेत.चौकट उद्धव ठाकरे म्हणाले, 'आपल्या हातात कोरोना लस आलीय, लसीकरण सुरु झालंय. 9 लाख कोविड योद्ध्यांना ही लस देण्यात आलीय. सुरुवातीला लसीबद्दल काही शंका उपस्थित झाले होते. मात्र, आज 9 लाख लसीकरण झालंय आणि त्यांना कोणताही दुष्परिणाम झाल्याचं आढळून आलेलं नाही. त्यामुळे मी राहिलेल्या कोविड योद्ध्यांना विनंती करेल की त्यांनी बेधडकपणे लसीकरण करुन घ्या. मग प्रश्न उपस्थित होतो की आम्हाला लस कधी मिळणार? तर 'सब उपरवाले की मेहरबानी'. केंद्र सरकार ठरवतंय की कुठल्या राज्याला किती द्यायच्या. आणखी काही कंपन्यांच्या लस येतील.'च़़ौकट 'मास्क घालणं अनिवार्य, लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क वापरावा लागेल''मी नेहमी शिवनेरीवर जातो, पण यावेळी मी मुख्यमंत्री म्हणून गेलो. शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली, जिंकण्याची जिद्द, इर्षा दिली. वार करायचा असेल, तर तलवारीचा हल्ला झेलायचा असेल तर ढाल हवी. कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती ढाल नाही, पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल असायला हवी. मास्क घालायला विसरलो, तर हा छुपा शत्रू आपल्यावर वार करु शकतो. मास्क घालणं अनिवार्य आहे. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क वापरावा,' असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.कोरोनाची लाट खाली जाते त्याच वेळेस लाटेला थांबवायचं असतं'उद्धव ठाकरे म्हणाले, 'कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजुतदारपणे सुचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला, पण तसं नाहीये. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते पण खाली जाते त्याच वेळेस या लाटेला थांबवायचं असतं.'नियम मोडलेले दिसले, तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल'पाश्चिमात्य देशांमध्ये लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहे. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन आहे. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता ही बंधनं पुन्हा आपल्याला पाळावी लागणार आहे. मंत्री नितीन राऊत यांनी घरचा विवाह सोहळा रद्द केला. याला म्हणतात खरी सामाजिक जाणीव. जनतेच्यावतीनं नितीन राऊत यांच्या मुलाला आशीर्वाद देतो. जर नियम मोडलेले दिसले, तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होईल. मास्क नाही वापरला तर दंड आकारला जाईन. आता लॉकडाऊन फक्त कागदावर, पुन्हा एकदा बंधनं पाळायला लागणार आहेत,' असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.


0 Comments