सांगोला ( प्रतिनिधी ) : कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून आठवडा बाजार सुरू ठेवला असताना काल रविवार रोजीचा सांगोला येथील आठवडा बाजार ऐनवेळी रद्द केल्याने हजारो रु.खर्च करून आपली जनावरे बाजारात विक्रीसाठी आलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला
रविवार दि .२१ फेब्रुवारी रोजी सांगोला येथे जनावरांचा व भाजीपाला यासाठी आठवडा बाजार कोबिड संदर्भातील नियम व अटींचे पालन करून सुरळीत भरला होता . पण पोलिस प्रशासनाने कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून बरिष्ठांच्या आदेशाने अचानक बाजार बंद करण्याचे ठरविले वकृषी उत्पन्न बाजार समितीला बाजार बंद करणे भाग पाडले.
अवघ्या तासाभरात दूरवरून जनावरे विक्रीसाठी व खरेदीसाठी आलेल्या शेतकरी व व्यापायांचा भ्रमनिरास झाला जनावरांचा बाजार बंद केला खरा पण भाजीचा आठवडा बाजार बंद का केला नाही तिथे कोरोना येत नाही का ? असेहीबोलले जात आहे . प.महाराष्ट्रात सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार प्रसिद्ध आहे . दर आठवड्याला जनावरे खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते . सोलापूर , सांगली , मिरज , पुणे , सातारा यासह कर्नाटकातील अनेक लोक जनाबरे खरेदीसाठी सांगोला बाजारात येतात-तालुक्यात सर्वच शेतकऱ्याकडे शेतीस पूरक म्हणून पशुधन जोपासले जाते .अडचणीच्या काळात शेतकन्यासाठी पशुधन लाखमोलाचे ठरते .रविवारी आठवडा बाजार होणार म्हणून शुक्रवार , पासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जनावरे दाखल झाली होती.बाजारातील सर्व पशुपालक सुरक्षित ठेवून बाजारात वावरत होते . दुपारी २ नंतर बऱ्यापैकी जनावरांचा बाजार संपतो.असे असताना पोलिस प्रशासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीस जनावरांचा बाजार बंद कराययास भाग पाडले .बाजार समितीनेही तात्काळ बाजार बंद | करावा असे जाहीर केले . परंतु अनेक शेतकन्यांनी हजारो रु.खर्चकरून जनावरे विक्रीसाठी आणली होती , काही शेतकऱ्यांनी टेम्पो , पिकअप भाड्याने घेऊन जनावरे , कडबा , वैरण विक्रीसाठी आणली होती.या सर्वांना अचानक बाजार बंद झाल्याने आर्थिक भुदैड य नाहक त्रास सहन करावा लागला याला जबाबदार कोण ? असे बोलले जात आहे .



0 Comments