महाराष्ट्र राज्यातून मायाक्का देवीच्या यात्रेला जाण्याच्या लगबगीत असणाऱ्या भाविकांची निराशा झाली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने कर्नाटक सरकारने मायाक्का चिंचणी येथील यल्लाम्मा देवीची यात्रा रद्द केली आहे . तसेच मंदिर ही बंद करण्यात आले आहे .
महाराष्ट्र आणि कर्नाटकातून देवीच्या दर्शनासाठी कोणीही येऊ नये , असे कर्नाटक सरकारने आवाहन केले आहे . महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील मायाक्का चिंचणी येथे मोठी यात्रा भरते . महाराष्ट्रातून या ठिकाणी अनेक भावी यात्रेसाठी जात असतात . परंतु महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होवू लागली आहे .
त्यामुळे महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे . कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत राहिल्यास कडक निबंध लागण्याची शक्यता आहे . कोरोना महामारीचा फैलाव वाढत आहे खासकरून महाराष्ट्रातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन चिंचली ता. रायबाग येथील मायाक्का देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.
यासंबंधी शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी आदेश जारी केला आहे. चिंचली मायाक्का देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात त्यामुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू शकतो हा धोका लक्षात घेऊन मंदिरात देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आल्याने यात्रा ही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मायाक्का देवीच्या दर्शनासाठी न येण्याचे आवाहन कर्नाटक सरकारने केले आहे.


0 Comments