सोलापूर : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या आणि भक्तांच्या सेवेसाठी शुक्रवार पासून गाडी क्रमांक ०१०४५/०१०४६ कोल्हापूर - धनबाद - कोल्हापूर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे
. गाडी क्रमांक ०१०४५ कोल्हापूर - धनबाद विशेष एक्स्प्रेस धावणार असून . ही गाडी कोल्हापूर स्थानकावरून आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी पहाटे ४.३५ वाजता सुटेल आणि धनबाद स्थानकावर तिसऱ्या दिवशी सकाळी ८.३५ वाजता पोहोचेल . या गाडीस मिरज , कवठे महांकाळ , ढालगाव , जत परभणी , सांगोला , पंढरपूर , कुडूवाडी , बार्शी , उस्मानाबाद , लातूर , परळी , पूर्णा , नांदेड , किनवट , अदिलाबाद , वाणी , मांजरी , सेवाग्राम , नागपूर , अमला , बैतूल , घोराडोंगरी , इटारसी , जबलपूर , कटनी , सतना , प्रयागराज छेओकी , दीनदयाल उपाध्याय , भभुआ रोड , सासाराम , डेहरी ऑन सोन , अनुग्रह नारायण रोड , गया , कोडरमा , परसनाथ आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे . ही गाडी सांगोला स्थानकावर सकाळी ७.३५ वाजता येईल व एक मिनिटाचा थांबा घेऊन ७.३६ वाजता सुटेल . तसेच पंढरपूर स्थानकावर हीगाडी गाडी सकाळी ७.५० वाजता येईल व पाच मिनिटांचा थांबा घेऊन ७.५५ वाजता सुटेल . क्रमांक ०१०४६ धनबाद- कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस धनबाद स्थानकावरून आठवड्यातील प्रत्येक सोमवारी सकाळी १०.२० वाजता सुटेल व कोल्हापूर स्थानकावर तिसऱ्या दिवशी दुपारी १२.४० वाजता पोहोचेल . या गाडीस परसनाथ , कोडरमा , गया , अनुग्रह नारायण रोड , डेहरी ऑन सोन , सासाराम , भभुआ रोड , दीनदयाल उपाध्याय , प्रयागराज छेओकी , सतना , कटनी , जबलपूर , इटरासी , घोराडोंगरी , बैतूल , ,वाणी , . अमला , नागपूर , सेवाग्राम , मांजरा , अदिलाबाद , किनवट , नांदेड , पूर्णा , परभणी , परळी , लातूर , उस्मानाबाद , बार्शी टाऊन , कुडूवाडी , पंढरपूर , सांगोला , जत रोड , ढालगाव , कवठे महांकाळ , मिरज स्थानकावर थांबा देण्यात आला आहे . ही गाडी पंढरपूर स्थानकावर सकाळी ८.१५ वाजता येईल व पाच मिनिटांचा थांबा घेऊन ८.२० वाजता सुटेल . तसेच ही गाडी सांगोला स्थानकावर सकाळी ८.३ ९ येईल व एक मिनिटाचा थांबा घेऊन ८.४० वाजता सुटेल . या गाडीस दोन ब्रेकयान , तीन जनरल , दहा स्लीपर , तीन एसी थ्री टियर , एक एसी टू टियर असे एकूण १ ९ कोच असतील . ही गाडी पूर्ण आरक्षित आहे


0 Comments