google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संकट वाढले! मंगळवेढ्यातील दुकान, मॉल, मंगलकार्यालये, हॉटेलसाठी मोठा निर्णय;दुकानदार मास्क वापरत नसतील त्यांच्यावर कडक कारवाई

Breaking News

संकट वाढले! मंगळवेढ्यातील दुकान, मॉल, मंगलकार्यालये, हॉटेलसाठी मोठा निर्णय;दुकानदार मास्क वापरत नसतील त्यांच्यावर कडक कारवाई

 संकट वाढले! मंगळवेढ्यातील दुकान, मॉल, मंगलकार्यालये, हॉटेलसाठी मोठा निर्णय; वाचा ‘ही’ महत्वाची बातमी मंगळवेढा शहरातील सर्व दुकाने,मॉल,मंगल कार्यालये,हॉटेल,कोचिंग क्लासेस आदी सार्वजनिक ठिकाणी नागरीकांनी मास्क वापरणे वापरणे आवश्यक असून जी व्यक्ती/दुकानदार मास्क वापरत नसतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली आहे


.आज तहसील कार्यालयात कोरोनासंदर्भात शहरातील मंगल कार्यालये मालक, हॉटेल्स चालक, व्यापारी अध्यक्ष व प्रतिनिधी, खासगी शिकवणी वर्ग आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्याप्रसंगी ते बोलत होते.राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भागात याचा प्रसार होऊ नये यासाठी मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागातील नागरिकांनी मास्क वापरणे सुरू केले पाहिजे.शहरातील सर्व दुकाने, मॉल,हॉटेल, मंगलकार्यालय येथे दुकानदार व ग्राहकांनी मास्क वापरणे आवश्यक केले आहे.शहरात आजपासून विना परवाना कोणताच कार्यक्रम घेता येणार नाही. लग्न कार्यास फक्त 50 जणांना मंजुरी देण्यात आली आहे.त्यापेक्षा जास्त नागरिक आढळल्यास नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय सील केले जाणार आहे.सर्व दुकानात दुकानदार व माल खरेदी केलेल्या आलेल्या ग्राहकांनी मास्क वापरणे सुरू करावे अन्यथा पहिल्या वेळेस दंड व दुसऱ्या वेळेस दुकान 15 दिवसांसाठी सील करण्यात येणार आहे.दुकानातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास दुकान 14 दिवस सील होणार आहे. प्रत्येक ठिकाणी मास्क वापरने गरजेचे असून रस्त्यावरून जात असताना मास्क लावणे गरजेचे आहे.अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.आजपासून मास्क घातल्याशिवाय दुकानातील माल ग्राहकांना दिला जाणार नाही.सार्वजनिक ठिकाणी सर्व दुकान मॉल हे सॅनिटाझेशन करून घेण्याच्या सूचना तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments