google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडी दोन टप्प्यात होणार

Breaking News

सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडी दोन टप्प्यात होणार

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणूक १५ जानेवारीला पार पडली आहे . १८ जानेवारीला मतमोजणी झाली असून तिथून पुढे ३० दिवसांत सरपंच , उपसरपंच निवड होणे बंधनकारक असल्यामुळे तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडी ९ व ११ फेब्रुवारी अशी दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती तहसिलदार अभिजित पाटील यांनी दिली .


सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २७ जानेवारीला काढण्यात आली होती . आता या पदांची निवड प्रक्रिया घेण्यासाठी १ व ११ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतींच्या प्रथम सभा घेण्यात येणार आहेत . मंगळवार दि . ९ फेब्रुवारी २०२१ रोजी आलेगाव , बामणी , देवळे , गायगव्हाण , महिम , नाझरेसंगेवाडी , तरंगेवाडी , अचकदाणी , भोपसेवाडी , डोंगरगाव , कमलापूर , मांजरी , वझरे , अजनाळे , हणमंतगाव , खिलारवाडी , जुजारपूर , मानेगाव , वाणिचिंचाळे , अकोला , हातीद , जवळा , महूद बु , राजुरी , उदनवाडी , वाकी ( शि ) , घेरडी , कडलास , किडविसरी , कोळे , लक्ष्मीनगर , लोटेवाडी , नराळे , पारे , य.मंगेवाडी , ह.मंगेवाडी , तिप्पेहळ्ळी , पाचेगाव बु , कटफळ या गावात प्रथम सभा आयोजीत करण्यात आल्या आहेत . तर गुरुवार दि . ११ फेब्रुवारी रोजी आगलावेवाडी , चोपडी , एखतपूर , हलदहिवडी , मेडशिंगी , निजामपूर , सोमेवाडी , वासूद , बुरंगेवाडी , डिकसळ , धायटी , जुनोनी , शिरभावी , वाटंबरे , बुध्देहाळ , हंगिरगे , इटकी , लोणविरे , मेथवडे , वाकी ( घे ) , गौडवाडी या गावात प्रथम सभा आयोजीत करण्यात आल्या आहेत .सरपंचाची थेट निवडणूक रद्द करण्यात आल्याने यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे . त्यामुळे , अनेक गावातील नवनिर्वाचित सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत . ज्या गावामध्ये दोन्ही पॅनलला समान जागा मिळाल्या तेथे सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली आहे . बहुतांश गावांमध्ये चित्र स्पष्ट असल्याने तेथे सरपंच कोण होईल हे जवळपास स्पष्ट झाले आहे . मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये काही ठिकाणी अपक्षांच्या हाती सत्तेची चावी आल्याचे चित्र आहे . काही ठिकाणी बहुमत असूनही आरक्षण निघालेला सदस्य नसल्याचे चित्र आहे . त्यामुळे , अशा ठिकाणी बहुमत नसतानाही सरपंचपद विनासायास मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागा निवडून आल्यानंतरही विरोधी गटातील मागास प्रवर्गातील सदस्याला सरपंचपदाची लॉटरी लागली असेही काही ठिकाणी पाहायला मिळाले आहे तर दुसरीकडे , सरपंच आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील अनेक सदस्य सत्ताधारी गटाकडे असल्याने सर्वात पहिला सरपंच पदाचा मान कोणास मिळतो हेही पाहणे औचुक्याचे आहे , यावरून वादही होऊ शकतो . अशा नाराज सदस्याचा अचूक वेध घेऊन विरोधकांनी थेट इच्छुकास सरपचपदाची ऑफर देऊ केली आहे . त्यामुळे सरपंच निवड होईपर्यंत नेमका कोण आणि कोणत्या गटाचा सरपंच होणार हे निश्चित सांगणे कठीण झाले आहे . सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर गटात फाटाफूट होऊ नये म्हणून अनेक सदस्य सहलीवर गेले असून , त्यांचा शोध सुरु आहे .

Post a Comment

0 Comments