सांगोला ( प्रतिनिधी ) : बांधकाम करायचे म्हटले की , सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्याने वाळूची व्यवस्था करावी लागते . मात्र , अशातच मागील काही वर्षापासून वाळू लिलाव झाले नसल्यामुळे वाळूला सुगीचे दिवस आले आहेत
. तालुक्यात साडे आठ - नऊ हजार रुपये ब्रास किंमतीने विकली जात आहे . ती अवाच्या सव्वा भावाने घ्यावी लागत असल्यामुळे घरबांधकाम करणाऱ्या गरजूनागरिकासह सर्वसामान्याचे गणित विघडले आहे . मागील काही वर्षापासून वाळूचे लिलाव झाले नसल्यामुळे बांधकामे प्रभावी झाली नाहीत . बांधकाम मिस्त्री व मजूर यापैकी काहीनी तर चक्क त्यांचा व्यवसायच बदलला आहे . वाळूच उपलब्ध नसल्यामुळे वाधकामे प्रभावित झाली नसली तरी मात्र ज्याचे घरकुल मंजूर आहे.त्याना मात्र बांधकाम करण्याच्या शासनाच्या सूचना असल्यामुळे त्यांना मिळेल त्या भावात वाळू विकत घ्यावी लागत आहे . यामुळे त्याच्यावर भूदंड बसत आहे . त्यामुळे बाधकाम व्यवसायीक व काही प्रमाणात वाहतूकदारही मागील काही वर्षापासून आर्थिक संकटात सापडले आहेत . प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रामाणात घरकुल मंजुर करण्यात आले आहे त्यांना लवकर घरकुल निर्माण करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत , पण बांधकाम साहित्यांचे दर सध्या गगनाला भिडले असून सर्वांचे घरकुल एकाच वेळी मंजूर झाल्याने मिस्त्री बांधकाम कामगार यांचेही मजुरीचे दर वाढले आहेत . अशात शासनाकडून मिळणाऱ्या अल्पशा अनुदानात गरिवाचे घरकुल खर्च साकार होईल का , हा खरा प्रश्न आहे .


0 Comments