नाशिक : खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण २८ टक्के असताना सरकारी लॅबमध्ये मात्र हे प्रमाण तीन टक्केच असल्याची गंभीर बाब पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर आरोग्य यंत्रणेने पुढे आणली होती .
त्यास आता दुजोरा मिळाला असून खासगी लॅबने दिलेल्या पॉझिटिव्ह रिपोर्टपैकी तब्बल ४५ टके रुग्णांचे पुनर्चाचणी रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याची धक्कादायक बाब महापालिकेच्या वैद्यकीय पथकाला आढळून आली . त्यामुळे खासगी लॅबच्या गोरखधंद्याची भांडाफोड झाली आहे . कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्हहया की निगेटिव्ह , अशी थेट ऑफर अमरावतीतील एका खासगी लॅबकडून जिल्हा परिषदेच्या सदस्याला देण्यात आल्याची बाब ताजी असताना नाशिकमध्येही अशाच प्रकारची फसवणूक आता पुढे आली आहे . कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वब तपासणीचे प्रमाण वाढवले आहे . अनेकांचा सरकारी लॅबवर विश्वास नसल्याने खासगी लॅबमधून चाचणी करण्यावर दिला जातो . मात्र यात पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले . पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत झालेल्या प्रशासकीय बैठकीत ही बाब पुढे आली होती . शहर आणि जिल्हा सरकारी लॅबमधील रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर सात टक्के असताना , काही खासगी लॅबमधील हाच दर २८ टक्क्यांपर्यंत असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले . त्यामुळे पालकमंत्री भुजबळ यांनी खासगी लॅबचे सॅम्पल पुन्हा तपासण्याचे आदेश दिले होते . त्यानुसार जिल्हा आणि महापालिकेकडून पडताळणी करण्यात आली . पुनर्तपासणीत जवळपास ४५ टक्के नमुने हे निगेटिव्ह आल्याची बाब पुढे आली . त्यामुळे खासगी लॅबचा गोरखधंदा उघडकीस आला आहे .


0 Comments