महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रवींद्र (दादा) कांबळे तर उपाध्यक्षपदी शुभम ऐवळे यांची निवड महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची सांगोला तालुका कार्यकारणी रविवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दैनिक सांगोला नगरी कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली
.यामध्ये सांगोला तालुका अध्यक्षपदी रवींद्र कांबळे तर उपाध्यक्षपदी शुभम ऐवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच पांडुरंग पाटील यांची तालुका सचिव, आनंद दौंडे यांची तालुका कोषाध्यक्ष,
संतोष साठे यांची तालुका महासचिव तर सिद्धेश्वर माने, हमीदभाई बागवान, चांदभैय्या शेख, उमेश मंडले, विकास वाघमारे, जगन्नाथ साठे, कैलास गोरे, चंद्रकांत ऐवळे, दादाश्री मागाडे, शशिकांत बनसोडे, किशोर म्हमाणे, बळीराम मोरे, सुनील वाघमोडे, अमोल महारनवर, गणेश कांबळे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांच्याशी भेटून पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करून, समाजातील शोषित, पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ही संघटना लढेल असे संघटनेचे नूतन तालुका अध्यक्ष रविंद्र कांबळे म्हणाले. यावेळी महाराष्ट्र राज्य डिजिटल संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, नुतन तालुकाध्यक्ष रविंद्र कांबळे तालुका उपाध्यक्ष शुभम ऐवळे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्यामध्ये डिजिटल मिडियाच्या पत्रकारांना संघटित करून त्यांच्या कार्याला चालना देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नव्याने ही संघटना सुरू केली असून संघटनेची पहिली पदाधिकारी निवड ही सांगोला तालुक्यापासुन करण्यात आली आहे.




0 Comments