सांगोला नागरिकांना बिअरबार परमिट रुमच्या तुलनेत कमी दराने दारू मिळत आसल्याने या ठिकाणची बनावट दारू पिऊन अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.काही परवाना धारक दारू विक्रेते नियमबाह्य पद्धतीने अवैध दारू विक्री करणा-यांना दारू देत आहेत. या सर्व प्रकाराकडे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी कानाडोळा करत आहेत.
त्यामुळे दिवसोंदिवस अवैध दारू व्यावसाय करणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर थातूरमातूर कारवाई करण्यात येते.व पुन्हा त्याच ठिकाणी जोमाने अवैध दारू विक्री सुरू असते. त्यामुळे सांगोला तालुक्यातील अवैध दारू विक्री बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाची भुमिका संशयाच्या भोव-यात सापडली आहे.
सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन सांगोला तालुक्यातील राजरोसपणे सुरू असलेले अवैध व्यावसाय बंद करण्यात यावेत व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.


0 Comments