google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाढत्या कोरोनामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला इशारा

Breaking News

वाढत्या कोरोनामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला इशारा

 वाढत्या कोरोनामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला इशारा

मुंबई:पुढारी ऑनलाईन 

‘राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सर्वाधिक रुग्ण वाढीचा दर हा विदर्भात नोंदविला गेला आहे. लोकांचा निष्काळजीपणा जर असाच वाढत राहिला तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याशिवाय पर्याय नाही,’ असा गंभीर इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.

अधिक वाचा:कोरोनावरून अजित पवारांचा जनतेला इशारा, लवकरच कठोर निर्णय घेणार असल्याचे दिले संकेत

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येते असल्यामुळे राज्यातील जनता निर्धास्त होती. पण यातून लोकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. यामुळेच आटोक्यात असणारी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की. ‘मुंबईत सुद्धा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. लोकल सुरू झाल्यामुळे आणि लोकांनी कोरोनाबाबत दक्षता ना पाळल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढली आहे. मास्क न वापरणे हा प्रकार कोरोना संसर्ग वाढीस कारणीभूत ठरत आहे. रुग्णसंख्या अशीच वाढू लागली तर लोकल बंद करणे हा आमच्यासाठी शेवटचा पर्याय आहे. तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्यास त्यास हे निष्काळजीपणाने वागणारे नागरिकच जबाबदार राहतील.’

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता त्या ठिकाणी चाचण्यांची संखय देखील वाढविणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. एकूणच वाढती रुग्णसंख्या ही सरकारसोबतच नागरिकांची डोकेदुखी वाढवणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

Post a Comment

0 Comments