google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ग्राम दक्षता समिती स्थापण्याचे निर्देश रेतीचे अवैध उत्खनन झाल्यास आता सरपंच - पोलीस पाटलांवर कारवाई !

Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ग्राम दक्षता समिती स्थापण्याचे निर्देश रेतीचे अवैध उत्खनन झाल्यास आता सरपंच - पोलीस पाटलांवर कारवाई !

 रेतीचे अवैध उत्खनन झाल्यास आता संबंधित गावच्या सरपंच व पोलीस पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती मिळाली आहे . याच विषयाचे अनुषंगाने वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी ग्राम स्तरावर ग्राम दक्षता समिती स्थापन करण्याचे निर्देश सुध्दा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत .


या समितीमध्ये ग्राम पंचायतीचे सरपंच अध्यक्ष , तलाठी सदस्य सचिव तर सदस्यांमध्ये ग्रामसेवक , पोलीस पाटील , कोतवाल आदींचा समावेश आहे . सदर समितीने दर पंधरा दिवसांनी बैठकीचे आयोजन करून वाळू - रेती अवैध उत्खनन वाहतूक होत असल्यास त्याला आळा घालण्यासाठी ग्रामदक्षता समितीने त्यांचे शिफारशी तहसीलदार यांना कळवाव्या असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटलेआहे . अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीपात्रातून अवैधरेतीचेउत्खनन - वाहतूक होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत . ज्या ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये अवैध रेती उत्खनन वाहतूक होत असेल अशा ग्राम पंचायतीच्या ग्राम दक्षता समितीस अवैध रेती उत्खनन वाहतुकी बद्दल जबाबदार धरण्यात येईल . असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे . ग्राम पंचायतीच्या हद्दीतून नदीपात्रातून , अवैद्य रेती वाहतूक होत असेल अशा ग्राम पंचायतीच्या सरपंचास जबाबदार धरून त्याचेविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १ ९ ५ ९ मधील कलम १४ ( ग ) , कलम ३ ९ ( क ) अनव्ये कारवाई प्रस्तापित करण्यात येईल , तर संबंधित पोलीस पाटील यांचे विरुध्द महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १ ९ ६७ कलम ९ अनव्ये कारवाई करण्यात येईल , ग्राम दक्षता समितीच्या इतर सदस्यां विरुध्द शासन परिपत्रक क्र . गौखनि १० / ३१६ / प्र.क्र . / २०४ / ख / दि .१४ जून २०१७ नुसार जबाबदारी निश्चित कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असा इशारा सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात दिला आहे .

Post a Comment

0 Comments