google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील अंबिका देवीची यात्रा भरणार नाही ; रविवार दि.२१ फेब्रुवारी चा जणावरांचा आठवडा बाजारही रद्द !

Breaking News

सांगोल्यातील अंबिका देवीची यात्रा भरणार नाही ; रविवार दि.२१ फेब्रुवारी चा जणावरांचा आठवडा बाजारही रद्द !

 सांगोला तालुक्यातील नागरीकांना कळविणेत येते की , श्री अंबिका देवी यात्रेबाबत तालुका स्तरीय समितीची व यात्रेचे कोर्ट रिसीव्हर तसेच सभापती , कृषि उत्पन्न बाजार समिती सांगोला यांच्या समवेत दिनांक १७/०२/२०२१ रोजी बैठक आयोजित करणेत आलेले होती .


सदर बैठकीमध्ये श्री अंबिका देवी यात्रेनिमित्त भरविणेत येणारे कार्यक्रम व जनावरांचा बाजार यावर पुढीलप्रमाणे सविस्तर चर्चा करणेत आली . 

सद्या राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना केसेस मोठया प्रमाणात आढळून येत आहेत . यात्रेमध्ये मोठया प्रमाणात बाहेरील राज्यातुन तसेच बाहेरील जिल्हयातून नागरीक येत असतात . तसेच जनावरांच्या बाजारामध्ये सुध्दा मोठया प्रमाणात जनावरे तसेच नागरीक येत असतात . यात्रेमध्ये नागरीक , जनावरांचे मालक , शेतकरी , व्यापारी यात्रा बघण्यासाठी व जनावरे बघण्यासाठी व घेण्यासाठी येत असतात त्यामुळे प्रचंड गर्दी होऊन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची व धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पुढील अनर्थ घडू नये याबाबत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे . तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेकामी शासनाचे निर्देशानुसार नियमांचे पालन करणे आवश्यक आहे . श्री अंबिका देवी यात्रेची माहिती काही नागरीकांना असल्यामुळे रविवार दिनांक २१/०२/२०२१ रोजी जनावरांचा आठवडा बाजारासाठी येणारे नागरीक यात्रा म्हणून येतील व त्याठिकाणी यात्रेचे स्वरुप येण्याची शक्यता आहे व जास्त दिवस जनावरे राहण्याची शक्यता आहे . 
त्यामुळे श्री अंबिका देवी यात्रेनिमित्त भरविणेत येणारे कार्यक्रम व जनावरांची यात्रा व दिनांक २१/०२/२०२१ रोजीचा जनावरांचा आठवडा बाजार सुध्दा रदद करणेचा समिती व उपस्थितांच्या सर्वानुमते निर्णय घेणेत आलेला आहे . समितीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार सांगोला तालुक्यातील तसेच बाहेरील जिल्हयातील व परराज्यातील नागरीकांना सुचित करणेत येते की , राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामध्ये वाढ होत असल्यामुळे श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त भरविणेत येणारे कार्यक्रम व जनावरांचा बाजार तसेच रविवार दिनांक २१/०२/२०२१ रोजीचा आठवडा बाजार रदद करणेत येत आहे असे जाहीर आवाहन करणेत येत आहे 

Post a Comment

0 Comments