Lockdown Breaking: रविवारी राहणार संपूर्ण लॉकडाउन…!
जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भआव पाहता जिल्ह्यात एक दिवसीय लॉकडाउन पुकारले आहे. येत्या रविवारी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी अकोला शहरात संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे. अकोला: अकोल्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अकोल्यात एक दिवसीय लॉकडाउन पुकारले जाणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी अकोला शहरात संपूर्ण लॉकडाउन राहणार आहेय… तसेच जिल्ह्यात आणखी निर्बंध लावण्यात येणार असल्याचे अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले.केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणं गरजेचे झालं आहे. पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी दरम्यान, अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भआव पाहता जिल्ह्यात एक दिवसीय लॉकडाउन पुकारले आहे. येत्या रविवारी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी अकोला शहरात संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे. अनलॉक फेज मध्ये नागरिकांनी कुठलीही काळजी न घेतल्याने आणि शाळा, हॉटेल, लग्न प्रसंग , समारंभ यातून जास्त लागण नागरिकांना झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची लस आली आहे आता कोणतीही खबरदारी घ्यावी लागणार नाही. या अविर्भावाने ही रुग्ण वाढले असल्याने प्रशासनानसह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
हेही वाचा - धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने मास्क लावणे, सोशल डिस्टनसिंग बाबत कठोर कारवाई केली तरच नागरिक नियम पाळतील अन्यथा आणखी रुग्ण संख्या वाढण्याची भीती आहे.अकोल्यात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असून, गत आठवडाभरापासून दररोज शंभर पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १२०० वर गेली आहे. लोकांची बेफिकीरी वाढल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा आलेख पुन्हा उंचावत आहे.वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी १६ फेब्रुवारीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतरही गर्दीवर नियंत्रण येत नसल्याने प्रशासन जिल्ह्यात लॉकडाऊनचा विचार करत आहे. परंतु, त्याआधी एकदा संधी द्यावी म्हणून निर्बंध कडक करण्यात येणार आहेत. आगामी काळात निर्बंध अधिक कडक होणार असून, तत्पूर्वी, रविवारी अकोला शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.


0 Comments