सांगोला: सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे .
गावाकडे कधीच न फिरकणारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावविकासाच्या गप्पा मारू लागल्याने सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात टीकाटिप्पणी होऊ लागली आहे . यातच सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याने गाव कारभाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहेतालुक्यामध्ये 61 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून , या निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत . ही निवडणूक याअगोदरच्या निवडणुकीपेक्षा राजकीयदृष्ट्या वेगळी असणार आहे . या अगोदरच्या झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक गावांमधून शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेसची युती होऊन निवडणूक लढवली जात होती . परंतु या वेळच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमधील पक्षविरहित आघाड्यांमुळे सध्या निवडणुकीतील स्थानिक आघाड्या कशा होतात , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुखे - पाटील यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना पाठिंबा देऊन विधानसभा निवडणुकीचे वातावरण बदलले होते . त्यामुळे शेतकरी कामगार पक्षामध्ये अस्वस्थता आहे . सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने यावेळच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरील आघाड्या कशा होतात , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . सध्या तरी नेतेमंडळींनी " थांबा व पाहा'चे धोरण अवलंबले असले , तरी गाव पातळीवरील इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे . विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरहित झालेली आघाडी या ग्रामपंचायत निवडणुकीत कितपत परिणाम करते ? पक्षीय युत्या की स्थानिक पात ग्रामस्तरीय आघाड्या होणार ? याकडे लक्ष लाग आहे .परिणाम करते ? पक्षीय युत्या की स्थानिक पातळीवर ग्रामस्तरीय आघाड्या होणार ? याकडे लक्ष लागले आहे . सरपंच आरक्षण सोडतीमुळे अस्वस्थता सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याने गाव पुढाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे . सरपंच होण्यासाठी इच्छुक असलेल्या गाव पुढाऱ्यांनी वॉर्डातील आरक्षण सोडतीनंतरच तयारी सुरू केली होती . सरपंचपदाचे आरक्षण निघाले की जोमाने तयारी सुरू ठेवायचे , असे चित्र प्रत्येक गावात दिसत होते . परंतु सध्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करणाऱ्या भावी सरपंचांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे . पक्षीय की स्थानिक आघाड्या ? सध्याच्या वातावरणामध्ये शेकाप , भाजप पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील . तसेच आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुखे पाटील यांचे गट एकत्रितपणे निवडणूक लढवतील , असे चित्र सध्यातरी दिसत आहे . ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावांमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक पातळीवरील आघाडी व युत्या यांनाच प्राधान्य दिले जाते . त्यामुळे पक्षीय युत्या की स्थानिक आघाड्या ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेसोशल मीडियावर टीकाटिप्पणींना उधाण या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर गप्पांना ( टीका - टिप्पणीला ) उधाण आले आहे . गावात कधीही न फिरकणारे सध्या गाव विकासाच्या गप्पा मारताना दिसू लागल्याने अनेक तरुण सोशल मीडियावर यावर टीकाटिप्पणी करताना दिसत आहेत . त्यामुळे या निवडणुकीत कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्यक्ष जाऊन प्रचार करण्यापेक्षा सोशल मीडियाचा मोठा वापर होणार असल्याचे चित्र सुरवातीलाच दिसून येत आहे .


0 Comments