google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गणपतराव देशमुखांचा वारसदार अनिकेत देशमुख एमएस ऑर्थो पास ! मात्र राजकारणात सक्रिय होण्याबाबत प्रश्नचिन्हच

Breaking News

गणपतराव देशमुखांचा वारसदार अनिकेत देशमुख एमएस ऑर्थो पास ! मात्र राजकारणात सक्रिय होण्याबाबत प्रश्नचिन्हच

 सांगोला ( सोलापूर ) : येथील विधानसभा निवडणुकीतील शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ . अनिकेत चंद्रकांत देशमुख हे एम . एस . ऑर्थो ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . शिक्षणांनतर ते राजकारणात सक्रिय सहभागी होणार का , याकडे सांगोलावासीयांचे लक्ष लागले आहे .


 . अनिकेत देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती . अल्पशा मताने विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता . विधानसभा निवडणुकीनंतर अनिकेत देशमुख यांनी आपल्या शिक्षणासाठी तालुक्याच्या राजकारणाकडे पाठ फिरवली होती . नुकतेच ते एम . एस . ऑर्थोची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . डॉ . अनिकेत यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यालय , बारावीपर्यंतचे शिक्षण लातूर येथे झाले . एम . बी . बी . एस . चे शिक्षण राजर्षी शाहू महाराज शासकीय मेडिकल कॉलेज , कोल्हापूर येथे तर एम . एस . ऑर्थोचे शिक्षण काशीबाई नवले मेडिकल कॉलेज , पुणे येथे पूर्ण केले आहे . एम . एस . ऑर्थो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे सांगोला शहर व तालुक्यातून अनिकेत देशमुख यांचे अभिनंदन केले जात आहे . विधानसभा निवडणुकीत माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या जागी शेवटच्या क्षणी त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांना शेकापतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली होती . मात्र अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला असला तरी त्या निवडणुकीत त्यांचा मोठा प्रभाव दिसून आला होता . परंतु निवडणुकीनंतर शिक्षणासाठी ते बाहेर गेल्याने शेतकरी कामगार पक्षाचे निवडणुकीतील उमेदवारच जनतेच्या संपर्कात नसल्याने त्यांच्यावर मोठी टीकाटिप्पणी झाली होती . आपले शिक्षण झाल्यानंतर आता ते पुन्हा राजकारणात सक्रिय सहभाग घेतात का , राजकारणात सक्रिय सहभाग घेतात का , याबाबत सगळीकडे चर्चा होत आहे .

Post a Comment

0 Comments