google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वीजबिल न भरणाऱ्या 14 लाख ग्राहकांचा तीन आठवड्यात वीजपुरवठा खंडीत करण्याचे निर्देश

Breaking News

वीजबिल न भरणाऱ्या 14 लाख ग्राहकांचा तीन आठवड्यात वीजपुरवठा खंडीत करण्याचे निर्देश

 वीजबिल न भरणाऱ्या 14 लाख ग्राहकांचा तीन आठवड्यात वीजपुरवठा खंडीत करण्याचे निर्देश


पुणे : 1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 29 हजार 811 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालकांनी दिले आहे.

महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील सोय केलेली आहे, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजबिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक व्हिडीओ कॉन्फरंन्सिगद्वारे बैठक पार पडली. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.)अंकुश नाळे यांनी हे आदेश दिले. सद्यस्थितीत पुणे (1032.80 कोटी), सातारा (140.36 कोटी), सोलापूर (259.12 कोटी), सांगली (192.54 कोटी) व कोल्हापूर (337.43 कोटी) जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 1962 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 1247 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या 14 लाख 29 हजार 811 वीजग्राहकांनी गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही.

Post a Comment

0 Comments