सांगोला , दि . १० ( प्रतिनिधी ) - दिव्यांग बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाह आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मालकीच्या असणाऱ्या व्यापारी संकुल व व्यापारी गाळ्यामध्ये राखीव जागा देण्याची तरतूद आहे .
तसे सरकारी आदेश असून त्याच्या अंमलबजावणी करत सांगोला नगरपालिकेने शहरातील नगरपालिकेच्या म लकीच्या असणाऱ्या व्यापारी संकुलामध्ये दिव्यांगासाठी राखीव ठेवलेल्या आठ गाळ्याचे पैकी चार जागांचे खुले गाळे लिलाव दिनांक १८ फेब्रुवारी रोजी होणार आहेत . तरी सांगोला शहरातील दिव्यांग बांधवांनी या गाळ्यांचा लाभ घ्यावा , असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे . सांगोला शहरातील मोठीबाजारपेठ पाहता नगरपालिकेने याअगोदरच मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुल आणि खुल्या जागा उद्योग , व्यवसायासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत . महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहून आपले जीवन जगता यावे . यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नातील पाच टक्के निधी तर व्यापारी संकुलातील तीन टक्के गाळे आरक्षित केलेल्या आहेत .गेल्या अनेक वर्षापासून अपंगांचे व दिव्यांगांचे प्रश्न प्रलंबित असताना राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या म ध्यमातून दिव्यांगांच्या आणि व्यापारी गाळे राखीव ठेवायची मागणी अनेक वेळा करण्यात आली होती . त्यानंतर सांगोला नगरपालिकेने गाळे आरक्षण करण्याचा निर्णय घेतला . उशिरा का होईना गाळे लिलाव निघाल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे . नगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत दिव्यांग बांधवां मधून माझ्यावर होत आहेत.तर दुसऱ्या बाजूला हेच व्यापारी गाळे दिव्यांगांच्या नावावर कोणी घेऊ नये यावरही नगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे


0 Comments